>> सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१४ ते २० जानेवारी===============
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी जलद गतीचा आहे. तुमच्या समोर अशा घटना घडतील जिथे तुम्हाला सचोटीचा, संवाद कौशल्याचा उपयोग करावा लागेल. तुमच्या कामात तुम्हाला नवीन संकल्पना सुचतील. थोडे मतभेद आणि वादविवाद देखील संभवतात. इतरांसमोर तुमचं बुद्धीचातुर्य उठून दिसेल. सोशल मीडिया द्वारे तुम्ही चांगला प्रभाव टाकाल.
या आठवड्यात अतिशय प्रामाणिकपणे वागा, खरेपणा मुळीच सोडू नका. तुमचं मत स्पष्टपणे कोणालाही न घाबरता किंवा कुठलेही दडपण न घेता मांडा. नवीन बदल घडवू शकता. तुमच्या डोक्यात सुरू असलेल्या संकल्पना आणि विचार इतरांना सांगा. हाती घेतलेलं काम, सारासार बुद्धीने हाताळा. वादाच्या प्रसंगी संयम ठेवा.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी उर्जादायक आणि प्रेरणादायक आहे. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. निराशेकडून नव्या उमेदीकडे घेऊन जाणारा हा काळ आहे. कामामध्ये चांगलं यश मिळू शकतं. लोकांना तुमच्या कर्तृत्वाची माहिती होईल. घरामध्ये किंवा कामामध्ये आनंदाचा प्रसंग येऊ शकतो. काही लपून राहिलेल्या गोष्टी समोर येतील.
या आठवड्यात तुम्हाला सचोटी, खरेपणा आणि प्रामाणिकपणा यांच्या आधारे वागण्याची गरज आहे. पारदर्शी पध्दतीने काम करा. एखादी नवीन सुरुवात करायची असेल तर करा. नोकरीमध्ये वरिष्ठांचा आणि घरामध्ये ज्येष्ठ मंडळींचा मान ठेवा. एखादं यश मिळालं असेल तर हुरळून जाऊ नका. कोणालाही कमी लेखू नका.
नंबर ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी भावभावनांचं प्राधान्य घेऊन येत आहे. तुम्ही मुख्यत्वे आनंदी राहणार आहात. तुम्हाला तुमच्या मनाचा कौल घेऊन, बुध्दी आणि इतर व्यवहारिक गोष्टींपेक्षा मन काय सांगत आहे त्याप्रमाणे वागून चांगला अनुभव येईल. कठीण परिस्थितीसुद्धा सकारात्मकतेने हाताळू शकाल. स्वतःमध्ये समाधानी रहाल.
या आठवड्यात तुम्ही भावनांमध्ये वाहवत जात नाही आहात ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोणामध्येही भावनिक दृष्ट्या अडकू नका. तुम्हाला आवडणारा एखादा छंद किंवा एखादी कला आत्मसात करा, त्यात वेळ घालवा. इतरांना पूर्ण मदत करा. तुमच्या बोलण्याने इतरांना आधार मिळू शकतो त्याप्रमाणे वागा. कृतज्ञ रहा.
श्रीस्वामी समर्थ.