>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन३ ते ९ डिसेंबर===============
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी वैचारिक गुंतागुंतीचा असणार आहे. अनेकविध विचारांनी मनावर परिणाम होऊ शकतो. निर्णय घेणं अवघड वाटू शकतं. तुम्ही ठरवलेल्या कामात किंवा तुम्ही आखलेल्या नियोजनात फार गती येणार नाही. एक प्रकारची स्तब्धता येऊ शकते. गोष्टी हव्या तशा पुढे सरकणार नाहीत. अकारण विलंब होऊ शकतो.
या आठवड्यात तुम्ही शांत बसून, तोलून मापून विचार करून पुढे जाण्याची गरज आहे. निर्णय घेताना बुद्धीने, सारासार विचार करून घ्या. भावनेच्या भरात किंवा कोणाच्या प्रभावाखाली येऊन काहीही करू नका. एकाग्रपणे काम करा. सगळ्यांच्या सोबतीपेक्षा एकट्याने काम करा. ध्यान, उपासना करा.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल पण तरीसुद्धा समाधान मिळणार नाही. आणखी पुढे काहीतरी करायला हवं अशी भावना येईल. भौतिक सुखसोयींपासून एक प्रकारची विरक्ती येऊ शकते. कंटाळा येऊ शकतो. कामामध्ये विलंब होऊ शकतो.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनाशी एकनिष्ठ राहायचं आहे. खरंच तुम्हाला नक्की काय हवं आहे, याचा नीट विचार करा आणि त्याप्रमाणे पुढे चाला. उथळ गोष्टींमध्ये अडकून राहू नका. भावनांमध्ये, भूतकाळात किंवा नैराश्यात अडकून राहू नका. मागे घडलेलं काहीतरी एकदाचं सोडून द्या. कुठेही खूप गुंतू नका.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या हिंमतीचा कस लावणारा असणार आहे. जे काही करत आहात त्यात तुमच्या धडाडीची आणि स्वबळाची परीक्षा होऊ शकते. शेवटच्या टप्प्याजवळ कुठेतरी काहीतरी अडथळा येऊ शकतो, काहीतरी कारणामुळे अडकू शकता. थोडा विरोध, विलंब होऊ शकतो, ध्येयामध्ये अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे. जिद्दीने, जोमाने आणि चिकाटीने पुढे चाला. मनाची डगमग होऊ देऊ नका, घाबरु नका. जुन्या वाईट अनुभवामुळे स्वतःचं खच्चीकरण करू नका. शरीर स्वास्थ्याकडे नीट लक्ष द्या. तुम्ही आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहात हा विश्वास ठेवा.
श्रीस्वामी समर्थ.