साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१० ते १६ नोव्हेंबर===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी धैर्य आणि संयमाचा कस लावणारा असणार आहे. तुमच्यातील चांगुलपणाची एक प्रकारे परीक्षा होईल. पण तुम्ही जर या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर पुढचा मार्ग निश्चितच सोपा होईल. या काळात तुम्हाला यश मिळवणे अवघड वाटेल. काहीतरी मिळवायला वाट बघावी लागेल. शरीरापेक्षा मनाचे बल महत्त्वपूर्ण ठरेल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही संयम ठेवून वागलात तर तुम्हाला तुमच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचणे सोपे जाईल. वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा हा काळ आहे. राग लोभ मत्सर अशा तमोगुण प्रधान वृत्तीवर शुद्ध सात्विक शांत भावनेने मात करा. सौम्य शांततेचा मार्ग निवडणे सुध्दा एक प्रकारचे धाडसाचे काम आहे हे विसरु नका.
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी पेलायला अवघड असला तरी तुम्ही संथपणे पुढे चालत राहाल. मार्ग पटकन सापडणार नाहीत. गैरसमज निर्माण होतील. बरीच जबाबदारी अंगावर पडेल. पण चांगली गोष्ट अशी की तुम्हाला त्रास देणाऱ्या काही गोष्टी आता संपणार आहेत. एक कटू शेवट होऊन, त्यापुढे एक सक्षम सुरुवात होणार आहे, हा विश्वास ठेवा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही परिस्थितीशी झगडायला जाऊ नका. लोकांशी बोलताना नम्रपणे आणि कमीपणा घेऊन बोललात तर त्रास कमी होईल. आत्ता तुमचे वर्चस्व दाखवण्याची वेळ नाही. थोडे धडपडलात तरी खचून जाऊ नका. विश्रांती घ्या. शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी घ्या. रात्रीचे वाद आणि चर्चा टाळा.
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी पूर्वी केलेल्या कामाचे चांगले फळ घेऊन येत आहे. कष्टाचं चीज होईल. लोकांकडून तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला हवं असलेलं नाव, हुद्दा, मान सन्मान, बक्षिस या सप्ताहात मिळू शकतात. एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल, काही प्रश्न सुटतील. कामातील एक टप्पा यशस्वीपणे गाठाल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवण्याची गरज आहे. लोकांनी मान दिला, मोठं केलं तर त्यांना खाली पाडू नका. त्यांना एकत्र घेऊन पुढे चाला. सगळ्यांना तुमचा आधार द्या. इतरांसाठी तुम्ही त्यांची ढाल बना. एक आदर्श नेतृत्व करा. अरेरावी करू नका. काही लोक तुमचा दुस्वास करू शकतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा!
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.