>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२८ एप्रिल ते ४ मे===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी लोकांकडून चांगला आधार, मदत आणि पाठिंबा घेऊन येत आहे. इतरांवर अवलंबून असलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. जुने मित्र किंवा नातेवाईक, मदतीसाठी तयार असणारे सज्जन लोक तुम्हाला भेटतील. तुम्हाला एखादी लहान भेटवस्तू मिळू शकते. कामामध्ये कौतुक होऊ शकतं.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही लोकांशी सलोखा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्या जवळच्या माणसांना तुमचं म्हणणं मोकळेपणाने सांगा. घरातल्यांसोबत थोडा निवांत वेळ घालवा. जुन्या आठवणी ताज्या करा. तुमच्या जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा नातेवाईकाला फोन करा, त्यांना जमेल तशी मदत करा. ग्रहणशील रहा. मन जिंकून जग जिंका!
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी वेग वान असणार आहे. झटपट गोष्टी घडतील. तुमचे अडकलेले काम नक्कीच या काळात मार्गी लागणार अशी खूप शक्यता आहे. तुम्हाला कुठेतरी सारखी ये जा करावी लागू शकते. लगीनघाई असल्यासारखे वाटेल. चांगल्या कामासाठी धावपळ होईल. कष्टांचे सार्थक होईल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही आळस झटकून कामाला लागण्याची गरज आहे. तुमच्या कडून कोणताही उशीर करु नका. तुमचे संभाषण संवाद यांकडे लक्ष द्या. बर्याच घटना घडतील त्यामुळे उत्साह ठेवा आणि जमेल तितका तुमचा सक्रिय सहभाग ठेवा. काही कामांचा आपणहून पाठपुरावा करा. जितके कष्ट कराल तितके फळ हे निश्चित!
नंबर 3:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. एखादा प्रमुख टप्पा गाठला जाईल. त्यामुळे तुम्हाला आतून उत्साह वाटेल. एखादा कार्यक्रम ठरेल. एखादा सण साजरा केल्यासारखा आनंद होईल. सगळ्यांची साथ मिळेल. एक चांगले निष्पन्न निघेल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. पुढची वाट मोकळी होईल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या परिश्रमाचे चांगले परिणाम अनुभवणार आहात. त्यासाठी तुम्ही थोडी सवड काढण्याची गरज आहे. तुम्हाला ज्यांनी आत्तापर्यंत साथ दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहून त्यांना तुमच्या आनंदात सामील करुन घ्या. आत्ता पाया मजबूत करुन पुढचे नियोजन करण्याची तयारी सुरु करा.
श्रीस्वामी समर्थ.