>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणेसाप्ताहिक टॅरो मार्गदर्शन ( १ ते ७ ऑक्टोबर)
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही अवघड प्रसंगांतून सुटणार आहात. आत्तापर्यंत सुरू असलेल्या समस्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. अडकलेल्या गोष्टी पुढे सरकतील. तुम्ही आतुरतेने वाट बघत असलेले उत्तर किंवा प्रतिसाद मिळेल. तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ मिळेल. एका अर्थी तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकाल. तुम्ही करत असलेली प्रार्थना किंवा उपासना यांना बळ मिळेल, आश्वासक घटना घडेल.
या आठवड्यात तुम्ही परिस्थितीला तोंड देताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमची साधना फलित होईल असा विश्वास ठेवा. याबरोबर काम प्रामाणिकपणे करत रहा, तुमचा पूर्ण प्रयत्न करा. बदल घडत असतील तर ते स्वीकारा, ते तुमच्या हितासाठी घडत आहेत असा विश्वास ठेवा. जे काही वागाल, कराल किंवा बोलाल, त्यामध्ये किंचितंही खोटेपणा ठेवू नका. स्वतःला मोकळं करा, विचार मोठा करा, चांगल्या प्रकारे व्यक्त व्हा.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आहे. कामामध्ये एक प्रकारचं यश येईल. तुम्ही एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचण्याची शक्यता आहे. मागे केलेल्या नियोजनाला आणि कष्टाला चांगल्या प्रकारे दाद मिळेल, त्यातून चांगलं निष्पन्न निघेल. पण मार्गावर पुढे जाण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीची वाट बघावी लागेल. लोकांचं सहकार्य मिळेल. जे करत आहात त्याचा विस्तार करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. यात्रा किंवा प्रवास संभवतात.
या आठवड्यात तुम्ही धैर्य आणि संयम ठेवण्याची गरज आहे. आहात त्या मार्गावर पुढे जाताना, पुढचे निर्णय घेताना, विचारमंथन करा, इतरांचे मत जाणून घ्या. कामाचा विस्तार कसा करता येईल, सुधारणा कशी करता येईल हा विचार करा. कोणत्याही परिस्थितीचा सगळ्या बाजूने विचार करा. तुम्ही आज जिथे पोचला आहात त्यात इतरांचा मोलाचा वाटा आहे याची जाणीव ठेवा आणि त्याबद्दल कृतज्ञ रहा. विनम्र आणि विनयशील रहा.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी संसाधनांचं प्राधान्य घेऊन येत आहे. तुम्ही वस्तू, पैसे, लोक, कौशल्य यांनी युक्त असाल. महत्त्वाची देवाणघेवाण घडू शकते. कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये लोकांकडून चांगला अभिप्राय मिळू शकतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. अडकलेले पैसे काही प्रमाणात सुटू शकतात. कामामध्ये भरभराट होऊ शकते. घराबाबत किंवा जमिनीबाबत, तुम्हाला चांगलं वाटेल अशी काही घटना घडेल.
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. योग्य तेवढा आणि योग्य तिथेच पैसे द्या. तुमच्याकडे असलेल्या वस्तूंचा अतिशय चोख पद्धतीने वापर करा. सगळ्या वस्तू त्यांच्या क्षमतेप्रमाणे वापरा. आर्थिक नियोजन नीट करा. कुठे आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. लोकांना मदत करा, विशेष करून आर्थिक किंवा भौतिक मदत करा. सगळ्यांचा सांभाळ करा. भावनिक न होता, व्यावहारिक वागा, पण तुटक वागू नका.
श्रीस्वामी समर्थ.