>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन31 डिसेंबर ते 6 जानेवारी ===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना, नवीन विचार आणि नवीन संवाद घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. वाटेत आलेला अडथळा दूर करण्याचा मार्ग सापडेल. अनुत्तरित प्रश्न सुटतील. स्पष्ट संवादातून काहीतरी मार्ग निघेल. एकूण परिस्थिती सुधारेल. कामामध्ये, घरामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घडेल.
या आठवड्यात तुम्ही बुद्धिमत्ता आणि वैचारिक कौशल्य वापरण्याची गरज आहे. भावनेपेक्षा तुम्हाला सारासार विचार करून कुठल्यातरी पर्यायापर्यंत पोचण्याची गरज आहे. एखादी नवीन सुरुवात करू शकता. वेळ वाया घालवू नका. तुमचं संभाषण अत्यंत स्पष्ट आणि खरं ठेवा. तुमचं मत परखडपणे मांडा, पण त्यात अरेरावी नको.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी काही अडथळे आणि अडचणी घेऊन येत आहे. हव्या तशा गोष्टी घडणार नाहीत. हव्या तशा वेगाने कामे पुढे सरकणार नाहीत. अडकलेली कामे तशीच राहण्याची शक्यता आहे. पण असं असूनही तुम्हाला त्याचा फार त्रास होणार नाही. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करुन चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकणार आहात.
या आठवड्यात तुम्ही एक नवीन दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. आलेली अवघड परिस्थिती तुम्हाला नक्की शिकवायला आणि समृद्ध करायला आली आहे असा सकारात्मक विचार ठेवून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच यश येईल. फक्त एक करा की संयम आणि धैर्य ठेवा कारण काहीही करताना विलंब होऊ शकतो.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी विश्रांती आणि मध्यांतराचा असणार आहे. खूप कष्ट करुन, बरेच अडथळे ओलांडून तुम्ही एका टप्प्यावर येऊन पोचल्याने आता तुम्हाला थोडा वेळ तरी आरामाची गरज वाटणार आहे. त्यामुळे कामे संथपणे होतील. अपेक्षित उत्तरं, अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. एका जागी थांबला आहात असं वाटेल.
या आठवड्यात तुम्हाला काम थोडं कमी करुन काही प्रमाणात विश्रांती घेण्याचा संदेश दिला जात आहे. आत्ता स्वतःला थोडं मागे ओढा, थोडा काढता पाय घ्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. धावाधाव थांबवा. शांतपणे काम करा. जमेल तेवढंच काम करा, दडपण घेऊ नका. वादविवाद आणि अतीविचार पूर्णपणे टाळा. प्रकृतीकडे नीट लक्ष द्या.
श्रीस्वामी समर्थ.