>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२१ ते २७ एप्रिल===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी स्थैर्य आणि दिलासा घेऊन येत आहे. तुम्ही तुमच्या कामात संथ पण सबळ वाटचाल करणार आहात. काही अडथळे किंवा अडचणी येऊ शकतात पण त्यातून तुम्ही आणखी मजबूत आणि सक्षम होणार आहात. प्रवास घडू शकतात. आर्थिक गोष्टी मार्गी लागतील. पण फळ मात्र सावकाश मिळेल म्हणून संयम ठेवा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही कृतिशील राहण्याची गरज आहे. तुमच्या कामात खूप कष्ट करा. जीव ओतून प्रामाणिक प्रयत्न करा. घाई न करता कोणतेही काम अधिक चांगले आणि परिपूर्ण कसे करता येईल याकडे लक्ष द्या. चिकाटीने काम केले तर उत्तम प्रगती होऊ शकेल. विश्वासाच्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकता.
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुष्कळ घडामोडी पटापट घडण्याचा हा सप्ताह असणार आहे. काही लोकांबद्दल तुमचे मत बदलेल. तुमच्या विचारसरणीला धक्का लागू शकतो. विभक्त होणे किंवा फूट पडणे किंवा मतभेद होऊन वाद होणे अशी परिस्थीती निर्माण होऊ शकते पण तुमचे संयम आणि धैर्य तुम्हाला यातून तारून नेईल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात कशीही परिस्थीती आली तरी खचून न जाता, तिला धीराने सामोरे जायचं आहे. लहानसहान भांडणं विकोपाला नेऊ नका, संयम आणि शांतता ठेवा. काही निरुपयोगी गोष्टी सोडून द्या, कचरा टाकून द्या. बदल हाच विश्वाचा नियम आहे आणि यातून काहीतरी चांगलेच होईल हा विश्वास ठेवा आणि त्या बदलत्या गोष्टींत सहभागी व्हा.
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन उमेद घेऊन येत आहे. मागचं विसरून नवीन सुरुवात करण्यासाठी तयार रहा. एक प्रसन्न आणि उत्साहवर्धक घटना घडू शकते. चांगला सकारात्मक बदल घडू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन संकल्पना सुचतील. तुमच्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाल. 'आजचा दिवस माझा' असा काळ आहे!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही नवीन काहीतरी सुरू करायचं आहे. तुमच्या मनात सुरू असलेले विचार आणि कल्पना लोकांपर्यंत पोचवा. मोकळेपणाने व्यक्त व्हा. सृजनशीलता बाळगा, वेगळ्या पद्धतीने काम करा. बदल घडत असतील तर ते स्वीकारा. गर्व न करता स्वतःचं केलेलं काम इतरांना दाखवा. आळस सोडलात तर उन्नती होईलच!
श्रीस्वामी समर्थ.