नवे वर्ष नवीन विचार, संकल्पना, संकल्प घेऊ येत असते. त्यामुळे आपल्या मनात अनेक विचारांचे जाळे पसरत जाते. नवे वर्ष कसे असेल, याबाबत आपण विचार करू लागतो. याचा अंदाज ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण बांधू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल २०२२ हे वर्ष, जाणून घेऊया...
सन २०२२ हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी जीवनातील अन्य बाबींसाठी सामान्य असले, तरी करिअरच्या बाबतीत अफलातून प्रगती करणारे ठरू शकेल. १६ जानेवारीच्या दरम्यान होत असलेले मंगळाचे धनु राशीतील संक्रमण तुम्हाला भाग्याची द्वारे खुली करणारे ठरू शकेल. त्यामुळे जीवनाच्या बऱ्याच क्षेत्रात अपार यश मिळवू शकता. करिअरच्या बाबतीत अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतील. तसेच प्रोफेशनल लाइफमध्ये प्रगती साध्य करू शकाल. शनीचा नवव्या स्थानातील संचार मिळकतीचे नवे स्रोत निर्माण करणारा ठरू शकेल.
सन २०२२ मधील एप्रिल महिन्यात होत असलेले बड्या ग्रहांचे राशीपरिवर्तन आर्थिक आघाडीसाठी उत्तम ठरू शकेल. बचत आणि धनसंचयाच्या योजना यशस्वी होऊ शकतील. आवड-निवड, छंद यावर सढळ हस्ते खर्च करू शकाल. मात्र, यामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधी आर्थिक आघाडी कमकुवत होऊन पैशांची चणचण भासू शकेल.
सन २०२२ मध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींचे कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सलोख्याचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील. वरिष्ठांचे मन जिंकण्यात यशस्वी ठराल. वृषभ राशीतील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२ हे वर्ष खूपच अनुकूल ठरेल. अभ्यासाची आवड वृद्धिंगत होईल. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एप्रिलनंतरचा काळ यशकारक ठरेल. विवाहेच्छुक मंडळींचे विवाह जुळून येण्याचे योग आहेत. सन २०२२ मध्ये दामप्त जीवन उत्तम राहू शकेल.