शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

Temple Rituals: मंदिरात देवाआधीही पहिला नमस्कार कासवाला का करतात माहितीय? वाचा कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 7:00 AM

Temple Rituals : मंदिरातले कासव ओलांडून जाऊ नये किंवा चुकुनही त्याला पाय लागू देऊ नये असे म्हणतात, त्यामागील धार्मिक दृष्टिकोन लक्षात घ्या. 

मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना अनेकदा आपला पाय बिचाऱ्या कासवावर पडला असेल. त्यावर कोणी फुले वाहिली असतील, तर ते आपले लक्ष वेधून घेते, पण अनेकदा कासव अगदी भुईसपाट आणि संगमरवरी असल्यामुळे आपल्या दृष्टीक्षेपात येत नाहीत. तसे असले, तरी देखील मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरठ्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्याला पूर्वजांनी घालून दिला आहे. त्याचे आपण पालन करतो. परंतु, प्रश्न असा पडतो, की सर्व मंदिरात सुरुवातीलाच किंवा गाभाऱ्याबाहेर कासव असण्याचे प्रयोजन काय असेल? यावर छान माहिती मिळाली-

कासव हे प्रतीक रूप आहे. कासव ठेवण्याची दोन कारणे आहेत. कासवाची आई आपल्या पिलांकडे केवळ वात्सल्य दृष्टीने पाहून त्यांचे पोषण करते. त्याचप्रमाणे देवळातील देवानेही आपल्याकडे वात्सल्य दृष्टीने पहावे असे त्यातून सूचित केले आहे.

दुसरे कारण म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपले पाय आत खेचून घेते, त्याप्रमाणे देवासमोर जाताना भक्ताने आपले काम क्रोधादिक विकार आवरून मगच दर्शन घेतले पाहिजे. 

कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते, तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ती तयारी असेल, तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सान्निध्य लाभेल.  तसेच कासवाचे पुढील गुण शिकण्यासारखे आहेत. 

कासवाचे गुण:-

१. शरणागत भाव असणे : यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते.

२. सत्त्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्‍नरत असणे : काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे, म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे.

३. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे : आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायम स्वरूपी रहाते.कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ `कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते', असा आहे. 

वास्तूशास्त्राच्या दृष्टीने कासवाचे महत्त्व : 

>> आपल्या घरात पितळाचे कासव ठेवावे कूर्म म्हणजे श्रीविष्णूला आपल्या घरात ठेवल्याने श्रीविष्णू सोबत श्रीमहालक्ष्मी वास आपल्या घरात राहतो घरात देवा समोर अथवा तिजोरी समोर उत्तर दिशेला तोंड करून पाण्यात ठेवावे त्यातील पाणी रोज पुर्ण घरात शिंपडावे.

>> वास्तुदोष असल्यास तुमच्या वाटचालीत अडथळे निर्माण होऊ शकतात. हे दोष दूर करण्यासाठी आधार घ्यायला हवा. साधनांच्या आधारे आपल्या यशातील अडथळे दूर करता येतात. यासंदर्भात खालील टिप्सचा वापर करा.

>> वास्तुदोष दूर करण्यासाठी कासव फार गुणाचे आहे. घरात कासव असेल तर घरातील रोग व शत्रू दूर रहातात.

>>करीयर किंवा नोकरीत पुढे जाण्यासाठी धातुनिर्मित कासव घरात आणा. त्याला पाणी भरलेल्या जारमध्ये किंवा भांड्यात ठेवून उत्तर दिशेला ठेवा.

>> कासव स्वतः दीर्घायुषी (120 वर्ष आयुष्य आहे कासवाला) असते. त्यामुळे घरातील व्यक्तींनाही दीर्घायुष्य लाभते.