शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

जया एकादशी केल्याने होतील चार प्रकारचे लाभ; कोणते? सविस्तर माहिती वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 11:45 AM

'देव भावाचा भुकेला' असे संतांनी सांगून ठेवले आहे. त्याला अपेक्षित असलेली निस्सिम भक्ती आणि प्रामाणिकपणा त्याच्या सेवेत अर्पण केला, की व्रतपूर्ती झाली असे समजण्यास हरकत नाही. 

दर महिन्यात दोन एकादशी येतात. अशा रितीने वर्षभरात २४ एकादशी येतात. अधिक मासात आणखी दोन एकादशींची भर पडते आणि वर्षभरात २६ एकादशी होतात. माघ मासात षटतिला आणि जया एकादशी येते. आज जया एकादशी. तिलाच भिष्म एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी केली असता चार लाभ होतात.

या एकादशीचे महत्त्व श्रीकृष्णाने यधिष्ठिराला समजावले होते. एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होते. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. जया एकादशीचे व्रत करणार्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते. या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते, अशी श्रद्धा आहे.

हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे. २३ फेब्रुवारी रोजी माघ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. ही एकादशी जया एकादशी या नावे ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते. असे म्हटले जाते, की या व्रतामुळे भूत, पिशाच्च आदि योनीतून मुक्तता मिळते.

जया एकादशीच्या दिवशी रवियोग आणि त्रिपुष्कर योग एकत्र येत असल्यामुळे या तिथीचे महत्त्व वाढले आहे. जया एकादशीचे व्रत केल्यामुळे धन संपत्तीत वाढ होते व आपल्या दैनंदिन कार्यात यश प्राप्त होते. 

हे व्रत तीन प्रकारे केले जाते. उपाशी राहून, फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन! परंतु, आजच्या धकाधकीच्या जिवनात असे कठोर व्रत करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यानिमित्त विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे, विष्णूंना भक्तीभावाने तुळस वाहणे विंâवा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले, तरी एकादशीचे पुण्य पदरात पाडून घेता येते. 

'देव भावाचा भुकेला' असे संतांनी सांगून ठेवले आहे. त्याला अपेक्षित असलेली निस्सिम भक्ती आणि प्रामाणिकपणा त्याच्या सेवेत अर्पण केला, की व्रतपूर्ती झाली असे समजण्यास हरकत नाही.