शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? अमाप यश, भरघोस लाभ; पद-पैसा, मान-सन्मान, शनी शुभच करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 7:19 AM

Numerology: या मूलांकाच्या व्यक्तींवर शनीची विशेष कृपा असते, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

Numerology: भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनेकविध शास्त्रांचा समावेश असून, त्यात ज्योतिषशास्त्राचे स्थान विशेष आहे. आपल्याकडे ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. ज्योतिषशास्त्र हे असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. 

नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह आपलेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत वक्री झाला आहे. सुमारे १४१ दिवस शनी कुंभ राशीत वक्री असेल. नोव्हेंबर महिन्यात कुंभ राशीत शनी मार्गी होईल. सन २०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत विराजमान असेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आताच्या घडीला मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तर कुंभ राशीचा साडेसातीचा मधला किंवा दुसरा टप्पा सुरू आहे. याशिवाय मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनी ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यावर मकर राशीची साडेसाती संपेल, असे सांगितले जात आहे. मूलांक ८ चा स्वामी शनी देव आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या लोकांचा जन्म ८, १७ आणि २६ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ८ आहे.

समाजात खूप मान-सन्मान मिळतो

शनी हा कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानला जातो. शनी मंदगतीचा ग्रह आहे. शनी न्यायाधीश असल्याने जसे तुम्ही कर्म कराल, तसा तो न्याय करतो, असे म्हटले जाते. ज्या व्यक्तींचा मूलांक ८ आहे, त्यांच्यावर शनी कृपा असते, असे सांगितले जाते. मूलांक ८ असलेल्या व्यक्ती मेहनती असतात आणि स्वतःच्या हिंमतीवर यश मिळवतात. त्यांना समाजात खूप मान-सन्मान मिळतो. ते नेहमी इतरांना मदत करतात आणि सत्याचे समर्थन करतात. कोणतेही काम पूर्ण केल्यानंतरच ते श्वास घेतात. याचा अर्थ ते त्यांच्या ध्येयाबाबत खूप गंभीर असतात. हे लोक पोलिस किंवा लष्करासारख्या सेवेतही काम करतात. यासोबतच हे लोक संशोधनाच्या क्षेत्रातही चांगले नाव कमावतात.

कोणत्या क्षेत्रात अधिक नाव कमावतात, होतो फायदा!

मूलांक ८ असलेल्या व्यक्तींना भरपूर पैसा मिळू शकतो. त्यांची आर्थिक स्थिती सामान्यतः स्थिर असते. खर्च करण्याकडे त्यांचा अधिक कल नसतो. ते बचत योजना आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला नफा कमावू शकतात. मूलांक ८ च्या व्यक्ती बहुतेक अभियंते किंवा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित काम करतात. हे लोक चांगले उद्योगपती देखील होऊ शकतात. बिल्डिंग मटेरियल सप्लायर, लोखंड आणि तेलाशी संबंधित व्यवसाय त्यांना अधिक फायदा देतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

मनाचा थांग लागणे खूपच कठीण

मूलांक ८ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव गूढ असतो. ते सहसा खूप शांत स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात काय आहे, याचा थांग लागणे खूपच कठीण मानले जाते. तसेच हे लोक नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक कामात सहज यश मिळते. मात्र जीवनात यशस्वी होऊनही हे लोक साधे जीवन जगतात, असे म्हटले जाते. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.

 

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष