शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Numerology: ‘या’ ३ तारखांना जन्मलेल्या लोकांवर असते बुध, धनदेव कुबेराची कृपा; अपार यश, पैसे कमी पडत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 10:20 AM

Numerology: तुमचा मूलांक कोणता? या मूलांकाच्या व्यक्ती आव्हानांचा निर्भय, धाडसाने सामना करत स्वबळावर यश कमावतात, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

भारतीय प्राचीन परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. ज्योतिषशास्त्र हे असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. (Numerology)

ऑगस्ट महिन्यात नवग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेला बुध स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत विराजमान झाला आहे. पुढील अनेक दिवस बुध कन्या राशीतच असणार आहे. बुध ग्रह उत्तम बुद्धी, तर्कक्षमता कारक असल्याचे सांगितले जाते. अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४ आणि २३ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ५ आहे. बुध हा मूलांक ५ चा स्वामी आहे. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींवर धनदेवता कुबेरांची विशेष कृपा असते. या मूलांकाच्या व्यक्तींना कुबेर देवाचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. धनदेवता कुबेरमुळे पैशांची चणचण भासत नाही, आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. धनलाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. 

व्यापार, उद्योगात यश आणि प्रगती 

मूलांक ५ असलेले लोक नेहमीच आव्हानांना आव्हाने म्हणून स्वीकारतात आणि कोणत्याही परस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करतात. हे लोक नवीन योजनांवर काम करून नफा कमावतात. व्यवसायात जोखीम पत्करायला ते नेहमीच तयार असतात. हे लोक मनी माइंडेड आणि बिझनेस माइंडेड असतात. मूलांक ५ असलेल्या लोकांना व्यापार, उद्योगात चांगले यश मिळते. प्रगती साध्य करू शकतात. बँकिंग, शिक्षण, प्रशिक्षण या क्षेत्रात करिअर करू शकतात. या व्यक्तींना अर्थशास्त्र आणि संगीताचेही चांगले ज्ञान असते, असे सांगितले जाते. 

धाडसी, निर्भयी आणि मेहनती

मूलांक ५ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव मनमिळाऊ असतो. या मूलांकाचे लोक प्रतिभावान असतात. ते धाडसी, निर्भयी आणि मेहनती असतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जाण्यास तयार असतात आणि त्यात ते विजयही मिळवतात. ते कधीही हार मानत नाहीत आणि सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात, असे मानले जाते. 

भाग्याचे धनी मानले जातात 

मूलांक ५ असलेल्या व्यक्ती भाग्याच्या धनी मानल्या जातात. ते बुद्धिमान आणि मेहनती असतात. अगदी लहान वयात ते मोठ्या हुद्यावर पोहोचतात. काम करून घेण्यात या व्यक्ती पटाईत असतात. त्यांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. त्यांना पैशाची कधीच कमतरता नसते. ते पहिल्यापासूनच त्यांच्या भविष्याबद्दल विचार करत असतात. यासोबतच नेहमी पुढे जाण्याचा मार्ग शोधत असतात. कामात कोणाची ढवळाढवळ त्यांना आवडत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने करायला आवडते. 

संवाद कौशल्य खूप चांगले

मूलांक ५ असलेल्या व्यक्ती खूप आकर्षक असतात. बुध वाणीचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे आपल्या बोलण्याने वाणीमुळे समोरची व्यक्ती या व्यक्तींचा प्रभाव पडतो. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींची तर्क करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य खूप चांगले असते. यांचा जनसंपर्क, मित्र परिवार खूप मोठा असतो. कौटुंबिक जीवनही आनंदी असते, असे म्हटले जाते. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. 

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष