शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

आज दिवसभरात मी काय शिकलो, याचा विचार करा आणि आजच्या संधीचे आभार माना - गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 3:04 PM

गौर गोपाल दास सांगतात, प्रत्येक दिवस एक संधी घेऊन येतो आणि प्रत्येक सायंकाळ एक अनुभव देऊन जाते! 

आज  हा लेख तुमच्या नजरेस पडला असेल आणि तो उघडून तुम्ही वाचला असेल, तर तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. त्याचे मुख्य कारण म्हणजे, तुम्ही काल रात्री डोळे बंद केलेत, ते आज सकाळी पुन्हा उघडण्याची तुम्हाला संधी मिळाली. अनेकांनी काल रात्रीच ती संधी गमावली आहे, हे लक्षात घ्या. मात्र, तुम्हाला ती संधी मिळाली आहे. संधी कोणती? तर दिवसाची, आयुष्याची नवी सुरुवात करण्याची, नवीन दिशा निवडण्याची. यासाठी रोज सकाळी पाच गोष्टी नक्की करा.

सकाळी उठल्यावर चुकूनही मोबाईल, लॅपटॉप, नोटबुक अशा गॅझेटना हात लावू नका. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेने करा. गॅझेट चार्जिंगला लावण्याआधी स्वत:ला सकारात्मक ऊर्जा देऊन दिवसभरासाठी चार्ज करा. ती ऊर्जा तुम्हाला दिवसभर सकारात्मकतेचे बळ देणार आहे. तुमच्याकडे काय नाही, ते आठवण्याऐवजी काय आहे, ते आठवून पहा. आपल्याजवळ असलेल्या गोष्टींची श्रीमंती नसलेल्या गोष्टींची उणीव भरून काढण्यास मदत करेल. 

दिवसभरात काय करायचे आहे, हे ठरवण्याआधी स्वत: दिवसभरातील आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज करा. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रयत्न केल्याने मलाही सर्व काही जमू शकते, हा आत्मविश्वास स्वत:ला द्या. जेणेकरून जगाने तुम्हाला कमी लेखले, तरी तुम्ही स्वत:ची साथ कधीच सोडणार नाही आणि तुमचा आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला खचू देणार नाही. 

कोणत्याही कामात आपल्या वतीने १०० टक्के प्रयत्न करण्याची तयारी ठेवा. याउपर ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्यांचा विचार सोडून द्या. मात्र, प्रयत्न न करता अपयश स्वीकारू नका. प्रयत्नांती अपयश आले, तरी ते आपल्या भल्या मोठ्या आयुष्याचा छोटासा भाग आहे, असे म्हणून ते अपयश पचवण्याची तयारी ठेवा. 

एकाच वेळी चार गोष्टी करण्यापेक्षा एकावेळी एकच गोष्ट करा. जर छोट्या छोट्या गोष्टी नीट करू शकला नाहीत, तर मोठ्या गोष्टी नीट कधीच करू शकणार नाही. यासाठीच प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक करा. त्याच छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद आणि जगण्याचे बळ देतील. 

पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला तुमच्या पडत्या काळात जशी कोणाची शाब्दिक, मानसिक, आर्थिक गरज असते, तशीच इतरांनाही असते. दुसऱ्याची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती मदत करा. मनात वैरभाव किंवा स्वार्थ न ठेवता केलेली मदत दुसऱ्यांपेक्षा तुम्हालाच अधिक आनंद देणारी ठरेल.

प्रत्येक दिवस एक संधी घेऊन येतो,प्रत्येक सायंकाळ एक अनुभव देऊन जाते!

या दोन्ही गोष्टींचा आयुष्यात पुरेपूर उपयोग करून घ्या आणि रोज नवीन संधी दिल्याबद्दल देवाचे मनापासून आभार माना. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी