शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

Think Positive: मन तळ्यात, की मळ्यात? मनाचा आढावा घेऊया ज्योतिष शास्त्राच्या मदतीने!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 1:39 PM

Think Positive: मन रमते, गुंतते तेव्हाच ते शांत असते, रिकाम्या मनात असूया, अनादर, द्वेष घर करतो; तो काढण्यासाठी करूया थोडेसे मनाचे वाचन!

>> सौ. अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक

संदीप खरे ह्यांचे सुंदर काव्य “ मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यांत...” कानावर पडले. इतके सुंदर काव्य रचणाऱ्या कवीचे मन किती कोमल मृदू असेल नाही. मग मी माझ्याच मनाचा शोध घेवू लागले ..माझे मन कश्यात असते किंवा कश्यात रमते ? गाणी ऐकण्यात ? प्रवास करण्यात ? स्वतःचे छंद जोपासण्यात कि आवडत्या पदार्थांवर ताव मारण्यात ? माझे मलाच हसू आले. मन कश्यात रमते त्याहीपेक्षा ते वास्तव जगतात नक्की कुठे असते ? हा प्रश्न योग्य वाटला. ज्योतिष समुपदेशन करताना प्रत्येक वेळी आपण पत्रिकेतील चंद्राची स्थिती पाहतो कारण चंद्र हाच आपल्या पत्रिकेचा “ करता करविता “ . मनाने हिरवा सिग्नल दिला कि आपण करत असलेल्या कामात जीव ओततो , समरसून जातो . मनाचा कौल मिळाला कि जग सुंदर वाटू लागते आणि मन प्रफुल्लीत होते पण हेच मन उदास झाले तर नाही नाही त्या व्याधी शरीर पोखरू लागतात आणि हेच जग निरस वाटू लागते अगदी जीवनाचा प्रवास संपवून टाकण्यापर्यंत विचारांची मजल जाते . अनेकदा मनावरील दडपण so called guilt सुद्धा त्याला कारणीभूत असते.

आज ह्या मनाबद्दल शास्त्रीय दृष्टीकोनातून जाणून घेण्याचा लहानसा प्रयत्न करुया . आजच्या जीवन शैलीचा विचार करता घड्याळ्याच्या काट्यावर जगणारे आपण सर्व कमी जास्त मानसिक तणाव घेत असतो किबहुना तो अपोआप येतच असतो . कार्यालय , घर , प्रपंच , आर्थिक घडी , मुलांची शिक्षणे त्यांचे विवाह ह्या सर्वातून प्रवास करताना आपल्या आयुष्याची संध्याकाळ कधी होते समजत नाही आणि ह्या सर्वच अगदी वयाच्या तरुण अवस्थेपासून आपल्यासोबत कित्येक वर्षाचा सहप्रवासी “ तणाव “ हा एक दिवस हळूहळू डोके वर काढू लागतो . मानसिक ताणताणाव शरीरावर एका रात्रीत प्रभाव टाकत नाही तर कित्येक वर्ष मनाच्या कोपर्यात दडलेला हा तणाव शरीराला आणि मनालाही असह्य झाला कि मगच त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात 

आज मनाच्या विविध अवस्थांचे कंगोरे बघुया. आजचा प्रगत सोशल मिडीया आपल्या आयुष्यावर अधिराज्य गाजवत आहे. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सोशल मिडीया मुळे सहजप्राय झाल्या आहेत . आपली एखादी कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्माण झालेले उत्कृष्ट मध्यम आहे. मग ती एखादी रचलेली चारोळी असो , लेखन असो , सहस्त्रचंद्रदर्शनाचा सोहळा असो किंवा सहलीची जाहिरात असो. अनेकांपर्यंत क्षणात पोहोचते . आपल्या अंगातील सुप्तगुणांना अनेकां कडून मिळालेली शाबासकीची थाप मनाला आनंद देते आणि कदाचित त्याचमुळे आता शेअरिंग वाढत आहे. कुठलीही गोष्ट मनात साचवून ठेवले कि आजार आलेच म्हणून समजा , पण त्या मनातील विचारांचा निचरा केला तर मन धबधब्यासारखे प्रवाहित होईल आणि आजारपणाचा लवलेश सुद्धा आपल्याला शिवणार नाही . पण आजकाल कुणाशी बोलायचे ते समजत नाही कारण नात्यातील विश्वास कमी होत आहे. 

आज दुःख , मनातील सल लपवून मी किती आनंदी आहे हे दाखवण्याचा अट्टाहास सुरु आहे हेही प्रकर्षाने जाणवते . मनातील सल , एकटेपणा शेअर करायलाच पाहिजे . तो प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात असतो. मनमोकळे बोलणे , हसणे आपण विसरून गेलो आहोत .आपण जे काही आहोत जसे आहोत ते सर्वप्रथम आपण स्वतः स्वीकारले पाहिजे , ते लपवून ठेवले तर त्याचा त्रास आपल्यालाच कालानुरूप होणार आहे. जग पुढे जातंय , नवनवीन शोध लागत आहेत , वयोमर्यादा वाढत आहे पण माणसाच्या आयुष्यातील स्ट्रेस कमी न होता वाढत चाललेला आहे आणि त्यातून अनेक मानसिक आजार जन्म घेत आहेत . कुणाशीही मोकळेपणाने न बोलणे, घुसमटत राहणे , नात्यातील संपणारा विश्वास त्यामुळे पोटातील शब्द ओठापर्यंत येत येत राहतात अशी काहीशी स्थिती निर्माण झालेली दिसते . पूर्वीच्या लोकांकडे भौतिक सुखाची रेलचेल नव्हती पण समाधान होते . आज सर्व सुखे पायाशी असूनही डीमेंशिया , अल्झायमर, मधुमेह , हृदयरोग ह्यांचे प्रमाण अगदी लहान वयातील लोकांमध्ये सुद्धा वाढताना दिसतंय .आपले शरीर कमकुवत करणारा आणि झोप उडवणारी सुखे शेवटी काय कामाची नाही का? 

मानवी शरीरातील प्रगल्भ अवयव म्हणजे मेंदू . मेंदूवर संपूर्ण ताबा हा मनाचा असतो म्हणूनच मन शुद्ध सात्विक आणि सशक्त असेल तर मेंदू हा व्यवस्थित कार्यरत असणारच . अनेक आजारांचा उगम हा मनातूनच होत असल्यामुळे थोडक्यात आजारांचे मूळ मनातच आहे त्यामुळे मनाचे आरोग्य उत्तम असणे आपल्यासाठी अति अति महत्वाचे आहे. मन निरोगी नसेल स्वछ्य नसेल तर ते आजारपणाने घेरले जाते . आपला मेंदू हा अनेक केमिकल्स चे मिश्रण आहे आणि त्यांचा योग्य समतोल राखला गेला तर मेंदू सतेज असतो योग्यपणे कार्यरत होतो . एखाद्याशी भांडणे , प्रेमाची प्रीतीची भावना प्रगट करणे , काळजी करणे, एकमेकातील स्नेह वृद्धिंगत करणे ह्या अश्या विविध भावना जेव्हा प्रगट होतात तेव्हा त्याच्या मागे मेंदूतील विशिष्ठ रसायन काम करत असते . ह्या भावभावना जश्या कमी अधिक होतील तसे ह्या रसायनाची निर्मिती सुद्धा होत असते. आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे ह्या रसायनाच्या निर्मितीची प्रक्रिया कमी होते आणि म्हणूनच आपला स्ट्रेस वाढतो आणि त्याचे अगणित परिणाम मनावर आणि पर्यायाने शरीरावर होताना दिसतात . 

मेंदूतून स्त्रवणार्या ह्या रसांचा समतोल राखायचा असेल तर आनंदी जीवन शैली असणे गरजेचे आहे . घरातील नात्यातील मोकळेपणा , नात्यातील ओढ , एकमेकांसाठी जगणे आणि आणि नात्यातील विश्वास असेल तर जगण्याची मजा और असते आणि हेच सर्व आजकाल संपुष्टात आले आहे. एकमेकांकडे जावेसे न वाटणे , लहान सहन गोष्टीत अगदी घरातल्या घरात सुद्धा लपवाछपवी ह्यात नाती आणि माणसे हरवून गेली आहेत . पूर्वीचा काळ आणि माणसे सुद्धा साधी सरळ भोळी होती , पैशाने फार साधन नव्हती पण मनाची श्रीमंती खूप होती , कुटुंबात एकोपा होता , मोठ्यांना मान देणे , कुटुंबप्रमुखाचे निर्णय एकमताने मान्य होत असत. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एका कुटुंबात अनेक कुटुंब प्रमुख निर्माण झाले. प्रत्येक जण आपापल्या पुरतेच जगतोता दिसतो आता . माझे मी बघीन त्याचे तो बघेल हीच भावना मनात खतपाणी घालायला लागली आहे. 

मन आनंदी ठेवण्यासाठी खूप मोठ्या खर्चाची गरज नसते लहान सहान घटना सुद्धा पर्वता इतकं आनंद देतात . जीवनाकडे बघण्याच्या संकल्पना आणि दृष्टीकोण आजकाल फार संकुचित झालाय आणि काहीतरी मिळवण्याचा सततचा ध्यास त्यासाठी जीवाची चाललेली सततची धडपड तसेच ह्या सर्वातून निर्माण होणारी असुरक्षित पणाची भावना ह्यामुळे मनाचा एकंदरीत समतोल नाही गेला तरच नवल.

पूर्वीचा काळ परत येणार नाही कदाचित नव तेच स्वीकारून पुढे जाणे सर्वार्थाने इष्ट ठरेल पण त्यातही पूर्वीचा एकोपा गोडवा निदान सणासुदीला किंवा समारंभातून जपला गेला पाहिजे. आजच्या पिढीतील मुलांना घरात चार पाहुणे यायची सवयच राहिलेली नाही. मग एकमेकांकडे राहायला जाणे तर फार दूर . अपवाद म्हणून आजही अनेक कुटुंब एकोप्याने नांदत आहेत नाही असे नाही पण हे उदा फार विरळ आहेत . आज सगळीकडे काहीतरी लपवण्याकडे कल असतो . घर घेतले गाडी घेतली कुणालाही सांगायचे नाही समजेल तेव्हा समजेल. पूर्वी असे नव्हते . आवर्जून सर्वांचे आशीर्वाद घेतले जात असत. सगळ्यांना मान देवून एखाद्या गोष्टीत सल्ला त्यांचे मत विचारले जात असे. कुणाची दृष्ट लागण्यासारखे कुणीही इथे मोठे नाही सगळे आपलेच असतात आणि राहतात . पण आजकाल मत्सर , विघ्नसंतोषी वृत्ती ,दुसर्याचे चांगले न पहावाने हे गुण वाढीस लागले आहेत ते निव्वळ हव्यासापोटी , सतत काहीतरी मिळवणे जे कधीच पुरे न पडणारे आहे. आणि मग त्यातूनच हि तुलना निर्माण होते . 

लहानपणी आपण खूप खेळायचो पण आता तेही विसरून गेलो आहोत त्यामुळे आता ट्रेन बस पकडायला सुद्धा दमछाक होते. गाणी ऐकणे , आपले छंद जोपासणे , पुस्तके वाचणे ,चित्रकला किंवा इतर गोष्टीत आपण दिवसातला काही वेळ तर नक्कीच देऊ शकतो त्यामुळे आपले मन आणि मेंदू सुद्धृढ राहील पण आपल्याला फक्त काम काम आणि काम ह्यातच मोठेपणा वाटतो. जीवनातील हे हलके फुलके आंनद जे तुमचे शारीरिक आणि मानसिक आजार दूर ठेवू शकतात पण दुर्दैवाने त्यालाच आपण मुकलेले आहोत .

आपले मन कश्यात आहे ते ओळखता आले पाहिजे. आपल्याला देवाने भरपूर वेळ दिलाय . रोजच्या जीवनशैलीतील जरासा वेळ आणि केलेला बदल सुद्धा आपल्याला आनंदाची कवाडे उघडून देयील. “ मी आनंदी आहे “ हे दाखवणे आणि “ मी खरच आनंदी आहे ”  ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . दाखवण्यापेक्षा खरच असणे निरोगी मनाचे लक्षण आहे. मी आनंदी नाही आहे , तरीपण ते दाखवत राहायचे कुणाला ? आणि कश्यासाठी ? त्यापेक्षा आपण आपल्याशी प्रतारणा न करता ते सत्य स्वीकारले तर आपण निश्चित आनंदी होऊ ह्यात दुमत नाही. प्रेमाचा दिखावा नको तर खरच ओलावा हवा .

आपल्या जीवनाचा लगाम आपल्या हातात असेल तेव्हाच खर्या अर्थाने आपण आनंदी होऊ , स्वछंदी पाखराप्रमाणे आकाशात इथून तिथे तिथून इथे मस्त भटकंती करू आणि जीवनाचा खरा आस्वाद घेवू . ह्याला काय वाटत आणि त्याला काय वाटत हे विचार खूप झाले आता मला स्वतःला काय वाटत हे महत्वाचे आहे . नकारात्मक लहरी आपल्याला त्रास देतात म्हणून नकारात्मक लोकांना दूर ठेवा , नकारात्मक मेसेज , घटना आणि अश्या प्रकारे बोलणारी लोक सुद्धा दूर असलेलीच बरी .जगातील सगळ्या घटना आपल्याला समजल्याच पाहिजेत हा नियम नाही. आपल्याला जे समजायला पाहिजे ते कळले कि पुरे , जराजाराश्या गोष्टीनी आपल्या इगो दुखावतो . सगळ्यांनी आपल्यालाच महत्व दिले पाहिजे आणि मी नसेन तर हे जग सुद्धा चालणार नाही माझ्याशिवाय सगळ्यांचे अडते  ह्या भ्रामक कल्पना विश्वातून बाहेर या. आपण जन्माला आलो त्याच्या आधीही हे विश्व होते आणि आपल्या नन्तर पण असणार आहे तेव्हा स्वतःला महत्व देवून “ मी “ पणा जोपासणे पुरे . जितके वास्तव लवकर स्वीकारू तितके अधिक आनंदी होऊ . 

आज हसणे विसरलो आहोत आपण . म्हणून तर हास्य क्लब ची निर्मिती झाली . पूर्वी कुठे होते असे. लोक मोकळ्या आकाशासारखी मोकळ्या मानाने जगत. विज्ञानाने प्रगती केली आपण चंद्रावर गेलो पण आपले मन कश्यात आहे ते अजूनही आपल्याला ओळखता येत  हे दारूण सत्य आहे.  मन मारून जगू नका . माझ्या एका मैत्रिणीला वेस्टर्न कपडे घालायला खूप आवडतात पण घालत नाही लोक काय म्हणतील ? मला कसे दिसेल ? आमच्या घरात सगळे ड्रेस साडी नेसतात . मी तिला म्हंटले लोक ? कुठली लोक? आणि तू घालायला सुरवात केलीस कि तुझ्या घरातील सुद्धा सर्व स्त्री वर्ग तुझी कॉपी करतील आणि घालतील. तू तुझे मन मारून अजिबात जगू नकोस.

लहानपणी आपण किती कला शिकलो मग मोठे झाल्यावर प्रपंचात अडकलो आणि विसरलो. शाळेत सुद्धा 8 तास सतत अभ्यास करून मेंदूवर ताण येऊ नये म्हणून चित्रकला , संगीत हे आपले सर्व शिकवले जात असे. आता नव्याने सुरवात करुया .

चला तर मग शोध घेवूया आपले मन नक्की कश्यात आहे ? जीवनातील अगदी जवळच असलेले अनेक आनंदाचे स्त्रोत नव्याने उमगतील.  करून पहा आणि अभिप्राय नक्कीच कळवा . 

संपर्क : 8104639230

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य