शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

Third Shravan Somvar 2021: तिसरा श्रावणी सोमवार: पाहा, शिवामूठ वाहण्याचा मंत्र, योग्य पद्धत आणि परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 1:50 PM

Third Shravan Somvar 2021: श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार कधी आहे, त्या दिवशी वाहिली जाणारी शिवामूठ, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, यावेळी म्हणावयाचा मंत्र, याबाबत जाणून घेऊया...

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये चातुर्मास, त्यातील श्रावण महिना आणि श्रावणातील शिवपूजन यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. भगवान महादेवांनी कामासूरावर विजय मिळवला होता, तसे आपल्या मनातील, विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजली असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते, ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो, असे सांगितले जाते. श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार कधी आहे, त्या दिवशी वाहिली जाणारी शिवामूठ, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, यावेळी म्हणावयाचा मंत्र, याबाबत जाणून घेऊया... (Third Shravan Somvar 2021 Date)

तुम्हांला स्वप्नात महादेव शिवशंकरांचे दर्शन झाले? पाहा, यामागील नेमका अर्थ व मान्यता

तिसरा श्रावणी सोमवार, २३ ऑगस्ट २०२१ रोजी असून, या दिवशी मूग शिवामूठ म्हणून वाहिले जातात. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केले जाते. शक्य असल्यास निराहार उपवास करावा. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी. शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर केवळ शिवशंकरांचा 'ॐ नमः शिवाय' हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. 

रुद्राक्षाचे ‘हे’ लाभ तुम्हाला माहितीयेत का? पाहा, धारण करण्याचा योग्य विधी व महात्म्य

शिवपूजन करण्याची सोपी पद्धत

श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे, असे सांगितले जाते.

श्रावणात जिवतीचा कागद का पूजला जातो? जाणून घ्या महत्त्व आणि नेमका भावार्थ

शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत आणि मंत्र

लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते. तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग शिवामूठ म्हणून वाहतात. शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा. मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास, शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, अशी प्रार्थना करावी. शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. दरम्यान, यंदाच्या वर्षी चौथा श्रावणी सोमवार ३० ऑगस्ट आणि पाचवा श्रावणी सोमवार ६ सप्टेंबर रोजी आहे. 

देवकार्यात घट्ट वनस्पती तूप निषिद्ध का मानले जाते? त्यामागील शास्त्रीय कारण वाचा

श्रीकृष्ण नवरात्र

तिसऱ्या श्रावणी सोमवारचे विशेष म्हणजे या दिवसापासून श्रीकृष्ण किंवा गोकुळाष्टमी नवरात्राची सुरुवात होते. श्रावण प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हे नवरात्र करतात. या नवरात्रात भागवत सप्ताह केला जातो. ते शक्य नसल्यास भागवताच्या एखाद्या स्कंधाचे या पठण श्रवण केले जाते. अथवा अखंड नामसप्ताह, कीर्तनाचे आयोजन केले जाते. अनेक कृष्ण मंदिरात तसेच विठ्ठल मंदिरातही हे नवरात्र उत्साहाने साजरे होते. याची समाप्ती गोपाळकाल्याने होते. भंडारा मात्र बहुतेक ठिकाणी असतो. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल