Tirupati Balaji Mandir Purification Rituals After Laddu Prasad Controversy: ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा। यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः।।, असे मंत्रोच्चार करून तिरुपती बालाजी वेंकटेश्वर मंदिरात शुद्धिकरण विधी करण्यात आला. तिरुमला तिरुपती वेंकटेश्वर बालाजी मंदिरातील लाडू प्रसाद वादात सापडला. यानंतर तिरूपतीच्या प्रसिद्ध 'लाडू प्रसादम्'ला पुन्हा पावित्र्य बहाल करण्यात आले. लाडू प्रसाद वादानंतर मंदिर आणि मंदिर परिसरात ४ तास होम, हवनासह अनेक शास्त्रोक्त विधी करण्यात आले. यानंतर आता सर्वकाही शुद्ध आणि पवित्र असल्याचे मंदिरातील गुरुजींनी सांगितले.
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
आता तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाचे पावित्र्य आणि शुद्धता पुनर्स्थापित करण्यात आली आहे. आता लाडू ‘निष्कलंक’ आहे. श्रीवारी लाडूची दिव्यता आणि पावित्र्य निर्विवाद आहे. सर्व भक्तांच्या समाधानासाठी लाडू प्रसादम्चे पावित्र्य कायम राखण्यासाठी देवस्थान कटिबद्ध आणि वचनबद्ध आहे, असे तिरुमला तिरुपती देवस्थानमकडून स्पष्ट करण्यात आले होते. वर्ष १४८० मध्ये लाडवाचा उल्लेख मंदिरातील नोंदीत आढळतो. त्यावेळी या प्रसादाला 'मनोहरम' असे म्हटले जायचे. मंदिर आणि परिसर शुद्ध तसेच पवित्र करण्यासाठी नेमके कोणते विधी करण्यात आले, या संदर्भात काही माहिती देण्यात आली असून, शास्त्रातील त्याचे महात्म्य आणि महत्त्व जाणून घेऊया...
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले?
हा पवित्र विधी पापमुक्तीचा विधी होता. या अंतर्गत ऋत्विकांकडून (पुजारी) वास्तू शुद्धिकरण (आणि) कुंभजला संप्रोक्षण करण्यात आले. वाईट, प्रतिकूल, अशुभ परिणामांपासून बचाव करण्यासाठी, लाडू प्रसादम, इतर नैवेद्य आणि भक्तांच्या कल्याणासाठी 'यज्ञशाळेत' सकाळी ६ ते १० या वेळेत पावित्र्य तिरुमला मंदिराचे शांती गृह 'वैखानासा आगमा'च्या तत्त्वांनुसार विधी करण्यात आले. मंदिराचे पुजारी पोट्टू, ज्या स्वयंपाकघरात लाडू बनवले जातात तेथील साहित्यावर पवित्र पाणी शिंपडले गेले. सकाळी 'संकल्प', 'विश्वसेन आराधना', 'पुण्याहवचनम्', 'वास्तु होमम', 'कुंभ प्रतिष्ठा' आणि 'पंचगव्य आराधना', असे विधी अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. यानंतर 'पूर्णाहुती', 'कुंभ प्रोक्षण' करण्यात आले. 'विशेष नैवेद्यम्' अर्पण करण्यात आले.
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
साहित्य, वास्तू, स्थानाच्या पावित्र्येतेसाठी शुद्धिकरण विधी
शुद्धिकरण म्हणजे एखादी वस्तू स्वच्छ करून शुद्ध करणे. हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. धार्मिक संदर्भाबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये मन, आत्मा आणि शरीराची शुद्धी करण्यात येते. तसेच काही कारणास्तव वास्तू, स्थान अपवित्र झाले असेल तर त्यासाठीही शास्त्रात सांगितल्यानुसार, शुद्धिकरण विधी केला जातो. गंगाजल किंवा पवित्र नद्यांचे पाणी एकत्र करून पूजा साहित्य, वास्तू, स्थान या ठिकाणी शिंपडले जाते. प्रोक्षण केले जाते.
तिरुपती बालाजी मंदिरात शुद्धिकरणासाठी शांती होमम
तिरुपती बालाजी मंदिरात शुद्धीकरणासाठी महाशांती होमम करण्यात आले होते. मंदिरातील प्रसादाचे लाडू अशुद्ध झाले असतील, तर त्याद्वारे अशुद्धता दूर करता यावी म्हणून महाशांती होमम करण्यात आले. मुख्यतः महाशांती होमम शुद्धिकरणासाठी आहे. कोणतेही स्थान शुद्ध, पवित्र करण्यासाठी शुद्धिकरण केले जाते. महाशांती होमममध्ये अनेक प्रकारच्या मंत्राचे पठण केले जाते. हवन केले जाते. त्यामुळे ते स्थान शुद्ध आणि पवित्र होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
दरम्यान, तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसादाचे महत्त्व अनन्य साधारण मानले गेले आहे. महाप्रसादाचे हे लाडू बनवण्याच्या प्रक्रियेला 'दित्तम' असे म्हटले जाते. गेल्या ३०० वर्षांत केवळ सहा वेळा हा लाडू करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. ३ ते ५ लाखांपेक्षा जास्त लाडू दररोज बनविण्यात येतात. ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल लाडू विक्रीतून देवस्थानला मिळतो. हे लाडू तयार करण्यासाठी १० टन बेसन, १० टन साखर, ७०० किलो काजूगर, १५० किलो वेलची, ३००-४०० लीटर तूप, ५०० किलो पाक, ५४० किलो मनुके याचे ठरलेले वजन आणि प्रमाण घेतले जाते. ३६ लाख लाडू गेल्या वर्षी १० दिवसांच्या वैकुंठद्वार दर्शनादरम्यान विकण्यात आले होते.