शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

सामान्य राहायचंय की असामान्य बनायचंय, या प्रवासात आहे 'या' छोट्याशा विचाराचा फरक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 2:50 PM

सहज काहीच शक्य नाही, मनुष्य जन्मसुद्धा नाही; मग यश बसल्या जागी मिळेल ही अपेक्षाच चुकीची नाही का?

एका महामार्गावर एक भला मोठा फलक लावला होता. त्यावर लिहिले होते, `जर सगळे करू शकतात, तर मीदेखील करू शकतो. मात्र, जर सगळ्यांना जमत नसेल, तर मला ते जमवायलाच हवे.' हे उद्गार आहेत, त्या प्रत्येक यशस्वी माणसाचे, ज्याने अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवल्या. 

याउलट, सामान्य माणसाचे उद्गार काय असते? 'जर सगळे करू शकतात, तर त्यांना करू द्या, मला ते करायचे नाही आणि सगळ्यांना जमत नसेल, तर मी तरी कशाला प्रयत्न करून पाहायचे?' 

सामान्य आणि असामान्य यांच्यातला हाच मुख्य फरक आहे. सामान्य लोक आव्हानाला घाबरतात, तर असमान्य लोक आव्हाने स्वीकारतात आणि यशस्वी होतात. पण मग, ही असामान्य लोक  यशाची गुरुकिल्ली घेऊनच जन्माला येतात का? नाही? तर ते स्वत: यशाचा मार्ग तयार करतात. 

यश आपोआप मिळत नाही, ते मिळवावे लागते. उत्तम महाविद्यालयात किंवा विश्वविद्यालयात प्रवेश मिळाला, म्हणून कोणी यशस्वी होत नाही. महाविद्यालयाचे यश, हे तुमचे व्यक्तिगत यश नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर तासन् तास अभ्यास करून, विविध विषयांचे ग्रंथ वाचून, जास्तीत जास्त मेहनत घेऊन तुम्ही परीक्षेला सामोरे गेलात, तर यश तुमचेच असेल. 

जसे, यश आपोआप मिळत नाही, तसे यशस्वी लोकही आपोआप घडत नाहीत. मोठ्या हुद्द्याची, मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असे नाही. तर, तुमची कामाची पद्धत, सहकाऱ्यांशी वागणुक, कंपनीला यशस्वी होण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत तुम्हाला यशस्वी ठरवते. 

कोणतेही नाते आपोआप यशस्वी बनत नाही, ते प्रयत्नपूर्वक यशस्वी बनवावे लागते. कुंडल्या जुळल्या, व्यक्तिमत्त्व जुळली, राहणीमान जुळले, म्हणून लग्न यशस्वी होत नसते. तर, लग्न यशस्वी करण्यासाठी दोघांना सुसंवाद साधावा लागतो, समजून घ्यावे लागते, एकमेकांचा आदर करावा लागतो, तडजोड करावी लागते, तेव्हाच नाते यशस्वी बनते, टिकते आणि रुजते.

आध्यात्मिक शक्ती सहज मिळत नाही, ती मिळवावी लागते. नामांकित संस्थेत किंवा आध्यात्मिक गुरुंकडे शिकवणी लावली, म्हणजे तुम्हाला अध्यात्मिक शक्ती प्राप्त होत नाही. त्यासाठी तुम्हाला आत्मशक्ती वाढवावी लागते. संयम वाढवावा लागतो. मन केंद्रित करावे लागते. आध्यात्ममार्ग अनुसरावा लागतो. तेव्हा आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते.

वरील सगळे मुद्दे लक्षात घेता रतन टाटा, नारायण मूर्ती, अब्दुल कलाम, धीरूभाई अंबानी, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर ही नावे डोळ्यासमोर आणा आणि सचोटीने प्रयत्न करून सामान्य ते असामान्य हा प्रवास पूर्ण करा. कारण, कोणतीही गोष्ट आपसुख मिळत नसते, ती मिळवावी लागते आणि मिळाली, की ती टिकवून ठेवावी लागते. यासाठी प्रयत्न, अभ्यास, चिकाटी आणि प्रचंड सकारात्मकता असावी लागते. या गोष्टी आत्मसात केल्या, की तुम्हीच आत्मविश्वासाने म्हणाल, 'अशक्य काहीच नाही!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी