शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

आज नव वर्षातील पहिली कामदा एकादशी; वर्षभरातील समस्त एकादशींचे महत्त्व थोडक्यात जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 1:42 PM

वर्षभरातील सर्व एकादशी काही ना काही लाभ मिळवून देणाऱ्या आहेत. परंतु यापलीकडे जाऊन विचार केल्यास लक्षात येते, की एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंना प्रिय असल्याने आपला भक्तीमार्गाचा प्रवास सुकर होतो आणि त्यांची कृपादृष्टी लाभते. 

एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, पारमार्थिक ओढ लागते, संसार सुखाचा होतो. निरोगी काया, सुदृढ आरोग्य आणि धन संपत्तीचा लाभ होतो. ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे. म्हणून दर महिन्यात दोनदा एकादशी येतात. त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान विष्णुंचा आशीर्वाद प्राप्त होतो. वर्षभरातील प्रत्येक एकादशीला महत्त्व आहे. ते महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊया.

>> चैत्रात कामदा आणि वरुथिनी एकादशी येते. कामदा एकादशीमुळे राक्षस योनीतून सुटका मिळते आणि वरुथिनी एकादशीमुळे सर्वकार्यसिद्धी प्राप्त होते. 

>> वैषाखात मोहिनी आणि अपरा एकादशी येते. ही एकादशी विवाह, सुख, शांती, समाधान प्रदान करते. त्याचबरोबर मोह मायेतून मुक्त करते. अपरा एकादशी सर्व पापांमधून मुक्त करते.

>> ज्येष्ठ मासात निर्जला एकादशी आणि योगिनी एकादशी येते. निर्जला एकादशीला अन्नग्रहणच काय तर पाणीही न पिता हे व्रत करायचे असते. ते केले असता सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते. तसेच योगिनी एकादशीमुळे कौटुंबिक सुख मिळते.

>> आषाढ महिन्यात देवशयनी आणि कामिका एकादशी येते. देवशयनी एकादशी अर्थात आषाढी एकादशीला वारीचे व्रत अंगिकारले जाते. वारी हा आयुष्याला समृद्ध करणारा अनुभव असतो. तो आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी घ्यायलाच हवा. कामिका एकादशीचे व्रत केल्याने पुढील जन्म कुयोनित अर्थात वाईट कुळात होत नाही.

>> श्रावणात पुत्रदा आणि अजा एकादशी येते. संतानप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. तर अजा एकादशीच्या व्रत हे मुलांवर कोणतेही संकट ओढावले जाऊ नये, त्यांना कसलीही कमतरता जाणवू नये यासाठी केले जाते. 

>> भाद्रपदात परिवर्तिनी आणि इंदिरा एकादशी येते. परिवर्तिनी एकादशीमुळे प्रापंचिक दु:ख दूर होते. इंदिरा एकादशीमुळे पितरांना  मोक्ष मिळून स्वर्गप्राप्ती होते.

>> अश्विन मासात पापांकुशा आणि रमा एकादशी येते. पापांकुशा एकादशीमुळे सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळून घरात भरभराट होते. तर रमा एकादशीमुळे सुख आणि ऐश्वर्य यांची प्राप्ती होते.

>> कार्तिक महिन्यात प्रबोधीनी अर्थात देवउठनी एकादशी तसेच उत्पन्ना एकादशी येते. कार्तिकी एकादशी केली असते भाग्य जागृत होते. त्यादिवशी तुळशीचा विवाह लावून दिला जातो.

>> मार्गशीर्ष मासात मोक्षदा आणि सफला एकादशी येते. मोक्षदा एकादशी मोक्ष देणारी तर सफला एकादशी यश देणारी असते.

>> पौष महिन्यात पुत्रदा आणि षटतिला एकादशी असते. पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा आणि दारिद्रय, दुर्भाग्यातून सुटका व्हावी यासाठी षटतिला एकादशी केली जाते. 

>> माघ मासात जया आणि विजया एकादशी येते. जया एकादशी सद्भाग्यप्राप्ती मिळवून देते तर विजया एकादशी शत्रूवर मात करण्याचे बळ देते.

>> फाल्गुन मासात आमलकी आणि पापमोचनी एकादशी येते. आमलकी एकादशीला आवळ्याच्या वृक्षाची पूजा केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते. तर पापमोचनी एकादशी आपल्याला पापातून मुक्ती देते.

>> ज्या वर्षी अधिक मास येतो, त्या मासात पद्मिनी एकादशीची भर पडते. ही एकादशी सर्व प्रकारचे सुख, आयुरारोग्य, धन धान्याची प्राप्ती देते.

वर्षभरातील सर्व एकादशी काही ना काही लाभ मिळवून देणाऱ्या आहेत. परंतु यापलीकडे जाऊन विचार केल्यास लक्षात येते, की एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंना प्रिय असल्याने आपला भक्तीमार्गाचा प्रवास सुकर होतो आणि त्यांची कृपादृष्टी लाभते.