रामायण काळात जनक मिथिला नगरीचा राजा होता. जनकपूर असे त्याच्या राजधानीचे नाव होते. जनकपूर हे नेपाळमधील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. ही नेपाळची राजधानी काठमांडूच्या ४०० किमी दक्षिण पूर्वेस आहे. हे शहर भगवान रामाच्या सासऱ्यांचे अर्थात सीतेच्या वडिलांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.वैशाख शुक्ल अष्टमीला तान्ह्या बाळाच्या रूपात सीता एका शेतकऱ्याला सापडली आणि त्याने ती राजाच्या सुपूर्द केली. जनकाने तिचा पित्याप्रमाणे सांभाळ केला आणि आपले नाव तिला देऊन जानकी अशी ओळख दिली. म्हणून ही तिथी सीता जयंती म्हणून साजरी केली जाते. जनकपूर येथे सीतेचे बालपण गेले. तिथेच प्रभू श्रीरामाशी लग्न झाले. येथे एक मंदिर बांधले गेले आहे. त्या मंदिराबद्दल जाणून घेऊया ५ महत्त्वपूर्ण गोष्टी.
१. सीता स्वयंवर येथे घडले: सीता स्वयंवर प्रसंगाचा उत्सव म्हणून विवाह पंचमीनिमित्त या मंदिरात लोक येतात. या ठिकाणी प्रभू रामाने शिव धनुष्य मोडले आणि स्वयंवराचा पण पूर्ण केला. त्या प्रसंगाची आठवण देणारा दगडाचा तुकडा त्याच धनुष्याचे अवशेष असल्याचे सांगितले जाते.
२. उत्तर धनुषा: येथे धनुषा नावाचा विवाह मंडप आहे, ज्यामध्ये विवाहा पंचमीच्या दिवशी राम-जानकीचे लग्न शास्त्रोक्त रीतीने केले जाते. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी आसपासच्या गावातून अनेक लोक येतात.
३. महारानी वृषभानू कुमारी यांनी हे मंदिर बांधले: जानकी माता मंदिर भारतातील टीकमगड येथील महाराणी वृषाभानु कुमारी यांनी येथे बांधले.पुत्र प्राप्तीच्या इच्छेने राणी वृष्णू कुमारी येथे राहत होती. येथे वास्तव्य करताना वृषाभानु कुमारी यांना माता सीतेचा पुतळा मिळाला. असेही म्हटले जाते की ही मूर्ती सोन्याची होती. येथेच त्यांनी मूर्ती स्थापित केली. आणि १९११ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
४. नौरखा मंदिर: या मंदिराला त्याकाळात नऊ लाख रुपये खर्च झाले होते, म्हणूनच हे मंदिर नौलखा मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराला जनकपूरधाम असेही म्हणतात. मंदिराच्या विशाल संकुलाच्या भोवती एकूण ११५ तलाव आहेत. या व्यतिरिक्त बरीच कुंड आहेत, त्यापैकी गंगासागर, परशुराम कुंड आणि धनुष-सागर अधिक प्रसिद्ध आहेत.
५. आतापर्यंत अखंड नामस्मरण चालू आहे: हे मंदिर बांधल्यापासून तिथे सातत्याने सीता-राम जप आणि अखंड नामसंकीर्तनाचे सुरू आहे.