शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

आजचा शनिवार सर्व राशींसाठी ठरणार खास; कोणाला कळणार शुभवार्ता तर कोणाला मिळणार आर्थिक संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 10:48 AM

तुमच्या राशीत आज काय छान घडणार आहे, चला जाणून घेऊ.

शनिवार विकेंड म्हणून सर्वांच्या आवडीचा असला, तरी न कर्त्याचा वार म्हणून बिचारा उपेक्षित ठरवला जातो. परंतु आजचे ग्रहमान आणि शिवजयंतीचा मुहूर्त बाराही राशींवर आनंदाचा वर्षाव करणार असल्याचे भाकीत आजच्या दैनंदिन पंचांगात केले आहे. तुमच्या वाट्याला आज काय छान घडणार आहे, चला जाणून घेऊया. 

मेष : आज तुमच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली महत्त्वाची कामे पूर्ण कराल. चांगले आर्थिक नियोजन करू शकाल. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तुमच्या घरातील खर्चात घट होऊ शकते.

वृषभ : आज आणि नेहमीच तुम्ही सर्वांशी नम्रपणे बोलले पाहिजे. राजकारणातील तुमचे संपर्क क्षेत्र विस्तारेल. राजकारणात नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. यासोबतच सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल.

मिथुन: आज तुम्ही आत्मविश्वास आणि मेहनतीने प्रत्येक ध्येय साध्य कराल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकता. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच, तुम्हाला नवीन नोकरीत भरपूर यश मिळेल. सासरच्या लोकांशी तुमची नव्या व्यवसायासंदर्भात चर्चा होईल.

कर्क : आज दिवसाची सुरुवात सामान्य राहील. तुम्ही पैशाची गुंतवणूक करण्यात मग्न असाल. जर तुम्ही कुटुंबातील सदस्यासोबत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ते लाभ होईल. कामाच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. यासोबतच कुटुंबातील सदस्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न कराल.

सिंह : आज तुम्ही राग बाजूला ठेवून आप्त स्वकीयांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न कराल. त्याचबरोबर नवनवीन आव्हानांना धैर्याने सामोरे गेलात तर मार्ग सुकर होईल. जमीन, मालमत्तेशी संबंधित कामे होतील. महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर शनिवारचा दिवस चांगला जाईल.

कन्या : तुम्ही  अंगात नम्रता बाणली तर अनेक कामं मनासारखी होतील. राजकारणातील संपर्क क्षेत्र विस्तारेल. तसेच नोकरीत नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. याशिवाय चांगल्या कामामुळे नोकरीत बढती आणि उच्च पद मिळण्याची चिन्हे आहेत.

तूळ : आज तुम्ही नवीन ध्येय निश्चित कराल आणि प्रयत्न सुरू कराल. काही व्यावसायिक बाबी तुम्ही हुशारीने हाताळू शकता. तुमची संपत्ती वाढू शकते. या शनिवारी कोणतेही काम करताना मन शांत ठेवा. घरगुती जीवनात नावीन्य  जाणवेल.

वृश्चिक: आज तुमच्या कुटुंबात परस्पर सौहार्द वाढेल. तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रत्येक बाबतीत स्पष्ट भूमिका ठेवा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सर्व काही ठीक होईल. तुमचे उत्पन्न चांगले राहील. तसेच काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

धनु : आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित नेहमीच्या तक्रारी जाणवणार नाहीत. तुमचा समजूतदारपणा आणि सभ्यता पाहून सर्वजण खूप प्रभावित होतील. बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. तुमचे म्हणणे पटवून देण्यासाठी योग्य शब्दांची निवड करा. 

मकर : महिलांसाठी आजचा शनिवार शुभ आहे. प्रार्थनेचा परिणाम आनंददायी ठरेल. स्वतःला उत्साही वाटेल. रखडलेल्या कामात गती मिळेल. पुरुषांनाही उत्कर्षाच्या संधी मिळतील. तसेच कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. 

कुंभ : तुमचा शनिवार आत्मविश्वासाने भरलेला असेल. कुटुंबातील तरुण सदस्याच्या यशाचा तुम्हाला अभिमान वाटेल. व्यावसायिकांसाठी शनिवार लाभदायक राहील. आर्थिक स्थिती सुधारल्याने तुम्ही खर्च करण्याच्या मनःस्थितीत असाल. नवीन कामात काही अडथळे येऊ शकतात. यासाठी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा, यश मिळेल. 

मीन: शनिवारी संध्याकाळपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कठोर परिश्रमाच्या मदतीने तुम्ही अवघड कामे सहज पूर्ण कराल. तसेच तुम्ही वेळेवर प्रकल्प राबवू शकाल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. तुम्ही एखाद्या ठिकाणाहून पैसे मिळण्याची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपेल आणि धनलाभ होईल!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष