शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

उद्या अंगारक विनायक चतुर्थी आहे; अन्य विनायकीच्या तुलनेत तिचे महत्त्व वेगळे का आहे ते जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 4:35 PM

संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे.

७ डिसेंबर रोजी अंगारक विनायक चतुर्थी आहे. ज्याप्रमाणे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली असता अंगारकी म्हणून तिचे महत्त्व वाढते, तसे विनायकी देखील मंगळवारी आली असता ती अंगारक विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ. 

प्रत्येक मासाच्या शुक्ल चतुर्थीला `विनायक चतुर्थी' असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते. तर ज्या कृष्ण चतुर्थीला 'संकष्ट चतुर्थी' म्हणतात, त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो, म्हणजे ती चंद्रोदयव्यापिनी असावी लागते. त्यात चंद्रदर्शनाला महत्त्व असते. हा दोन्ही चतुर्थींमधला मुख्य फरक आहे. 

प्रत्येक मासाच्या शक्ल आणि कृष्ण चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमुद आहेत. परंतु, त्यांचा अधिक तपशील मिळत नाहीत. माघ शुक्ल चतुर्थीला कश्यपमुनी आणि अदिती या दांपत्याच्या पोटी गणपतीने `महोत्कट विनायक' नावाने जन्म घेतला आणि राक्षसांचे पारिपत्य केले. तर कृष्णपक्षात संकष्टीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांच्या पोटी गणेशाने जन्म घेतला, ती भाद्रपद चतुर्थी! पुढे देवांचा सेनापती म्हणून गणेशाने काम केले. म्हणून या दोन्ही चतुर्थींना गणेशव्रत केले जाते. 

संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. उपास शक्य नसेल, तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून 'ओम सिद्धिविनायकाय नम:' या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी.

त्याचप्रमाणे अथर्वशीर्ष म्हणून गणेशाची पूजा करावी. अथर्व म्हणजे ज्याचे मस्तक हलत नाही, शांत असते, संकटकाळातही स्थिर असते, अशा गजाननाचे स्तोत्र. हे स्तोत्र मनोभावे पठण केले असता, तसेच या स्तोत्राची स्पष्ट उच्चारासह एकवीस किंवा सहस्र आवर्तने केली असता, वाचासिद्धी येते असा भाविकांचा अनुभव आहे.

आजच्या तणावात्मक वातावरणात, ही व्रत आणि त्यांचे उपचार मन:शांती देतात. स्तोत्रांची ताकद सकारात्मक वलय निर्माण करते. उपासामुळे आरोग्यशुद्धी होते. जपजाप्यामुळे मन एकाग्र होते. पूजेमुळे वातावरण प्रफुल्लित होते. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम आपल्या तनामनावर होतो. म्हणून अशा व्रतांचे पालन स्वान्तसुखासाठी तरी अवश्य करावे. 

 

टॅग्स :ganpatiगणपती