शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

उद्या कामदा एकादशी, तिलाच 'चैत्रवारी' असेही म्हणतात; मूळ वारीशी तिचा संबंध आहे का, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 14:13 IST

वारी हे देखील व्रत आहे. व्रत करण्यामागे भावना असते संकल्पाची आणि सातत्याची. ज्या गोष्टीत सातत्य ठेवतो, त्याचे फळ मिळाल्यावाचून राहत नाही. आध्यात्मिक क्षेत्रात अशा गोष्टी सुचवण्यामागेदेखील हेच कारण आहे. व्रत वैकल्यांमुळे मन:शांती लाभते आणि त्यानिमित्ताने प्रभू नाम घेतले जाते. 

चैत्र शुक्ल एकादशीला 'कामदा एकादशी' असे नाव आहे. या व्रतामध्ये एकादशीला पूर्ण दिवसाचा उपवास करून द्वादशीला पारणा म्हणजे उपवास सोडवायचा. तसेच एकादशीला विष्णुपूजा करायवयाची असते. सर्व पापे दूर करणारी, पापांचा परिहार करणारी अशी ही कामदा एकादशी असल्याचे मानले जाते. एकादशीला रात्री भगवान श्रीविष्णूंची मूर्ती झोपाळ्यावर ठेवून तिच्या समोर जागर करावा असे पुराणात सांगितले आहे. 

या एकादशीला पंढरपूराची वारी करण्याची प्रथा आहे. या वारीला चैत्रवारी असेही म्हणतात. सद्यस्थितीत चैत्रवारी करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. परंतु दोन चार वर्षातून एकदा चैत्रवारी जरूर करावी. तीदेखील शक्य नसेल, तर आषाढी-कार्तिकीच्या वारीचा योग चुकवू नये. 

वारी हे देखील व्रत आहे. व्रत करण्यामागे भावना असते संकल्पाची आणि सातत्याची. ज्या गोष्टीत सातत्य ठेवतो, त्याचे फळ मिळाल्यावाचून राहत नाही. आध्यात्मिक क्षेत्रात अशा गोष्टी सुचवण्यामागेदेखील हेच कारण आहे. व्रत वैकल्यांमुळे मन:शांती लाभते आणि त्यानिमित्ताने प्रभू नाम घेतले जाते. 

कामदा एकादशीचे महत्त्व सांगणारी कथा -

नागपूरमध्ये पुंडरिक नावाचा राजा राज्य करीत होता. ललित-ललिता या नावाचे एक गंधर्व दांपत्य त्याच्या पदरी होते. एके दिवशी ललिताच्या गैरहजेरत ललित दरबारातील मैफलीत गात होता. परंतु ललिता सोबत नसल्यामुळे त्याचे गाण्यात मन लागेना. परिणामी त्याच्या गायनात वरचेवर चुका होत होत्या. त्या मैफलीचा पार बेरंग झाला. त्यामुळे राजा रागावला. त्याने रागाच्या भरता ललितला शाप दिला, 'तू राक्षस होशील!'

त्या शापाप्रमाणे ललित गंधर्व राक्षस झाला. तो त्याच अवस्थेत रानावनात हिंडू लागला. त्याच्यामागे ललितादेखील रानात गेली होती. तिने पतीची ही सारी दुरावस्था पाहिली. वाटेत एा वनात तिला एक ऋषी भेटले. त्यांच्याकडे तिने ही सारी कर्मकहाणी सांगून यावरील उपाय विचारला. त्यावेळी त्या ऋषींनी तिला मोठ्या श्रद्धेने कामदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. या व्रताच्या पुण्यप्रभावाने राजाच्या शापामुळे राक्षस झालेला ललित पुन्हा गंधर्व झाला. 

एकादशीचे व्रताचे आचरण

या दिवशी विष्णुसहस्रनामाचे श्रवण करावे, पठण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नम: हा मंत्रजप करावा. यथाशक्ती दानधर्म करावा. अधिक मासातील शुक्ल एकादशीला कामदा एकादशीचे व्रत अधिक पुण्यप्रद मानले जाते.