शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

‘तोरा मन दर्पण कहलाये’...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 7:31 PM

दर्पणासमान असलेले मन आपणास सर्वकाही दाखविते.

-‘तोरा मन दर्पण कहलाये’ म्हणजेच मनुष्याचे मन हेच दर्पण आहे. दर्पणासमान असलेले मन आपणास सर्वकाही दाखविते. म्हणूनच ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दीचे कारण’ हे समर्थ रामदास म्हणतात ते काही खोटं नाही.जीवनातील चढ-उतार दैवी महापुरुषांना, ज्ञानी संत-माहात्म्यांना चुकले नाहीत,  थोडक्यात सांगायचं तर, अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन हा वाळवंटातील मृगजळाप्रमाणे एक भ्रम आहे. त्यामुळे, अडचणींच्या ओझ्याखाली ‘मन’मारुन जगण्यापेक्षा अडचणी पेलून त्यावर मात करण्याचा ‘मना’पासून प्रयत्न करायला हवा. मनाची ताकद फार मोठी आहे. मनावर सत्ता मिळवून अनेक ऋषी-मूनी संत महात्म्यांनी जग जिंकले आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशाचे गमक मन हेच आहे. मनापासून केलेलं कोणतेही कार्य सिद्धीस जाते. त्यामुळे आपलं मन प्रसन्न असायला हवं. मनाची प्रसन्नता लढण्याची सकरात्मक शक्ती आपल्या पाठीशी उभी करते. म्हणून तर संत महात्म्यांनी मनाला आवर घालून त्याला प्रसन्न करण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे.‘जे मागतात शक्ती, आभाळ पेलण्याची...देते त्यास आई, उंची हिमालयाची...’

म्हणजेच आभाळ पेलण्याची शक्ती मागणाºयांच्या कवेतच हिमालयाची उंची असते. मात्र,  स्पर्धेच्या युगात वावरताना, जीवनात सातत्याने धडपड करताना, माणूस इतरांशी मनमोकळं बोलणं सोडा, माणसं स्वत:शी ही बोलत नाहीत. नुसती स्पर्धा आणि पैशाची हाव, यातच तो गुरफटून गेलाय. कधी आपण आपल्या अपयशाने खचुन जातो, तर कधी दुसºयाच यश पाहून आपल्याला मनस्ताप होतो. काय करावं? याबाबतही अनेकांचा नुसताच गोंधळ आहे.  या ताणतणावाने ग्रासलेल्या जीवनशैलीमुळे कित्येकांचं मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली तर ठीक, नाहीतर होणाºया मनस्तापामुळे अनेकजण खचून जातात. वेडावाकडा निर्णय घेतात. आज वाढलेल्या आत्महत्येच्या संख्येमागे मनस्ताप हेच प्रमुख कारण आहे. अगदी बंद खोलीतील रोल मॉडेल (सिनेमातील नट)ही याला अपवाद नाहीत. मनाला चटका लावणाºया अनेक गोष्टी आपल्या अवती भवती घडत असतात.मनाचा समतोल, संयम आणि मनाला लावलेलं योग्य वळणच आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाऊ शकतं, ही गोष्ट खरी असली तरी सोपी नक्कीच नाही.आध्यात्मिक गुरू प.पू. रविशंकर म्हणतात की, प्राचीन ऋषींनी सांगितले आहे , ‘श्रवण’ आधी ऐका आणि मग ‘मनन’ म्हणजे विचार मंथन करा. मग ते अंगीकारा. कुणीतरी काही म्हटले म्हणून त्यावर विश्वास ठेऊ नका. त्याचबरोबर कुणी काही म्हटलेले झिडकारूनही टाकू नका. गीतेतील सर्व ७०० श्लोक सांगून झाल्यावर श्रीकृष्ण म्हणतात, ‘ विचाराचे स्वातंत्र्य, मताचे स्वातंत्र्य, विश्वास आणि श्रद्धेचे स्वातंत्र्य द्यायची गरज आहे. म्हणूनच आधी ऐका आणि त्यावर विचार मंथन करा, मग तो तुमचा स्वत:चा अनुभव बनेल. मग तो सूज्ञपणा बनतो.

- शून्यानंद संस्कारभारतीखामगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक