शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

Travel: गजानन महाराजांचे रत्नागिरीतील सुंदर मंदिर तुम्ही पाहिले आहे का? सविस्तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 5:40 PM

Travel: गण गण गणात बोते, हा सिद्धमंत्र देणारे गजानन महाराज यांचे रत्नागिरीस्थीत सुंदर मंदिर प्रेक्षणीय आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती... 

>> मकरंद करंदीकर 

आपल्या हिंदू धर्मातील मंदिरे, मठ, तीर्थस्थाने याबद्दल अनेक दंतकथा, कथा, त्याबद्दलचे काही किस्से आपण ऐकतो. रत्नागिरी शहरापासून, पावस मार्गावर फक्त १२ कि.मी. अंतरावर, श्री संत गजानन महाराजांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराबद्दलही असेच काही आश्चर्यकारक व योगायोगाचे किस्से ऐकायला मिळतात.

सध्याच्या युगात प्रत्येक जण अनेक प्रश्न, संकटे आणि अडचणीने गांजलेला असतो. त्यावर बहुतेक सामान्य संसारी माणूस हा देवधर्मातून, भक्तीमार्गाने उपाय शोधत असतो. शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांचा भक्त परिवार देश विदेशात खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. अलीकडे आपण खूप मोठमोठ्या श्रीमंत देवस्थानांमधील गैरप्रकारांबद्दल बातम्या वाचतो. पण गजानन महाराज यांच्या शेगाव येथील देवस्थानचे व्यवस्थापन, स्वच्छता, शिस्त, भक्तमंडळींच्या उत्तम व्यवस्थेची मात्र  आपण खूप चांगली वर्णने ऐकतो. गजानन महाराजांच्या अन्यत्र असलेल्या मंदिरातही तीच शिस्त, स्वच्छता, पारदर्शकता, भक्तांची स्वयंशिस्त आढळून येते.

रत्नागिरी नजिकच्या गोळप या ठिकाणी असलेले गजानन महाराजांचे मंदिर असेच अत्यंत प्रशस्त स्वच्छ आणि भव्य आहे. मंदिराच्या भोवती चारही बाजूंना पाण्याचे छोटे खंदक आहेत. हे मंदिर २०१६ मध्ये सुरू झाले. सकाळी ६ll ते रात्री ७ll पर्यंत हे मंदिर दर्शनार्थ खुले असते. गुरुवारी खिचडी व झुणका भाकरीचा प्रसाद असतो.  

मूळचे या गावातील आणि  मुंबईतील रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करणारे कै. वसंतराव गोगटे हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या मनात या ठिकाणी गजानन महाराजांचे मंदिर  बांधण्याची खूप इच्छा होती. त्यांच्या येथील घरात जायला, कोकणातील खालची आळी, वरची आळी या रचनेप्रामाणे जेमतेम पायवाट होती. तरीही १९८६ मध्ये, शेगावची महाराजांची पालखी, हत्ती घोड्यांसह त्यांच्या घरी आली. आता महाराजच येथपर्यंत आले आहेत तर त्यांचे कायमस्वरूपी मंदिर येथे व्हायला हवे, असे त्यांना तीव्रपणे वाटू लागले. पण सर्व गोष्टी आणि याचे आर्थिक गणित जमवायचे कसे हा प्रश्न होता. या वसंतराव गोगटे यांना गजानन महाराजांच्या चरित्रावर निघालेल्या दूरदर्शन मालिकेमध्ये, साक्षात गजानन महाराजांचेच काम करण्याची सुसंधी लाभली. हाच गजानन महाराजांचा आदेश आहे, इच्छा आहे असे मानून त्यांनी त्यांना मिळालेले त्याचे सर्व मानधन या कामासाठी दिले व सुरुवात केली. या  प्रचंड खर्चासाठी त्यांचा हा एक अत्यंत पवित्र असा हातभार होता. त्यांचे पुतणे श्री. माधव गोगटे हे आता या मंदिराची व्यवस्था पाहतात. 

 या मंदिराच्या प्रांगणात, गजानन महाराजांची, एक पाय खाली सोडून बसलेल्या सुप्रसिद्ध छबितील, एक प्रचंड म्हणजे सुमारे १८ फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. असे कळले की ही मूर्ती खरे तर माहिमच्या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात बसविण्यासाठी तयार करण्यात आली होती. पण तेथे कांहीं तांत्रिक कारणामुळे ते शक्य न झाल्याने, त्या मूर्तीचा स्थानापन्न होण्याचा योग मात्र या गोळपच्या मंदिरात होता हे खरे !  या मंदिरातील गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन तर अगदी हमरस्त्यावरून जातांना सुद्धा सहजपणे होते. मुख्य मंदिराशेजारी पठण, पारायण, कीर्तन, प्रवचन इत्यादींसाठी एक प्रशस्त सभागृह बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. श्री गजानन महाराजांचे जगभर पोचलेले, 'श्री गजानन विजय ' हे चरित्र लिहिणारे दास गणू महाराज ( सहस्रबुद्धे) यांची मूळ वास्तू आणि विठ्ठल मंदिर रत्नागिरीनजिकच्या   कोतवडे येथे आहे, हा सुद्धा एक योगच म्हणायचा ! इथली  प्रसन्नता आणि पावित्र्य याचा अनुभव घेण्यासारखा आहे.

ll गण गण गणात बोते ll