शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

त्रिपुरी पौर्णिमा हा त्रिपुरासुराच्या वधाचा विजयोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 7:30 AM

त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते. मंदिरातील दगडी दिपमाळांमध्ये त्रिपुर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो.

वैकुंठ चर्तुदशीचा दुसरा दिवस त्रिपुरी पौर्णिमा या नावे साजरा केला जातो. ३० नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, त्या विजयसोहळ्याची ओळख या पौर्णिमेला मिळाली आणि ती त्रिपुरी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. 

हेही वाचा : आळस, अज्ञान व अंधार यांच्या घोर निद्रेत असलेल्या मानवाला जागवणारी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी- पांडुरंगशास्त्री आठवले

चातुर्मासातील चार महिने भगवान विष्णू शेषसागरात विश्रांती घेत असल्यामुळे त्यांच्या वाटणीच्या कारभाराची सूत्रे महादेवांनी आपल्या हाती घेतली. त्याच वेळेस त्रिपुरासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर हाहा:कार माजवत होता. ब्रह्मदेवांकडू वरदान मिळाल्यामुळे तो उन्मत्त बनला होता. त्या नियंत्रणात आणण्यासाठी, नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचा समूह महादेवांकडे आला. तेव्हा महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचे पारिपत्य केले आणि त्याचा वध करून भगवान विष्णूंची भेट घेतली. तसेच चार मासांचा कार्यकाल संपवून, वैश्विक व्यवहाराची सूत्रे विष्णूंच्या हाती सोपवून महादेवांनी तपश्चर्येला जाण्यासाठी प्रयाण केले. हरी-हराची ही भेट अविस्मरणीय ठरली. म्हणून या दिवशी जो नर नारी या दोहोंचे स्मरण करून बेल, तुळस वाहील, श्रद्धेन प्रार्थना करेल, त्याला मरणोत्तर वैकुंठप्राप्ती होईल, असा आशीर्वाद महादेवांनी दिला. म्हणून वैकुंठ चर्तुदशी पाठोपाठ त्रिपुरी पौर्णिमा हे दोन्ही सण दिवाळीसारखेच जल्लोषाने साजरे केले जातात. देवांची परस्पर भेट आणि आनंद सोहळा देवदिवाळी म्हणूनही साजरा केला जातो. 

त्रिपुरी पौर्णिमेला चार्तुमासाची सांगता होते. याच्या आदल्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते. 

त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते. मंदिरातील दगडी दिपमाळांमध्ये त्रिपुर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो. तसेच या दिवशी दीपदानही केले जाते. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातला थोडातरी अंधार दूर व्हावा, ही दीपदानामागील सद्भावना असते. 

प्रबोधिनी एकादशीपासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेला होते. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते. 

हेही वाचा : Tulasi vivah 2020 : तुलसी विवाह मुहूर्त, तिथी आणि विधी