शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत घ्या काकड आरतीचा दिव्य अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 12:39 PM

Tripuri Purnima 2024: काही ठिकाणी संपूर्ण चतुर्मास, तर काही ठिकाणी कार्तिक मासात काकड आरती करतात, मात्र एकादशी ते पौर्णिमा आवर्जून या दिव्यत्त्वाची अनुभूति घ्या!

रोज सकाळी, दुरून कुठल्यातरी मंदिरातला घंटानाद आपल्या कानावर पडत असेल. तो घंटानाद आहे, काकड आरतीचा. मुख्यत्त्वे कार्तिक शुद्ध एकादशीपासून (Kartik Ekadashi 2024) त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत (Tripuri Purnima 2024)काकड आरती सुरू असते. यंदा १२ ते १५ नोव्हेंबर हा अनुभव घेता येईल! काकड आरतीच्या वेळी काकड्याने (वातीचा एक प्रकार) देवाला ओवाळले जाते, म्हणून या आरतीला काकड आरती म्हणतात. पहाटेची झोप मोडून काकड आरतीत एकदा सहभागी होऊन बघा. तो आनंद अवर्णीय आणि शब्दातीत असतो. मंगल पहाटे घंटेचा नाद, धुक्याची चादर, उद धुपाचा सुवास आणि त्यात भगवंताची मोहक मूर्ती! एकदा तरी अनुभूती घ्याच! काकड आरतीची अनेक काव्ये प्रचलित आहेत. जसे की,

सत्व रज तमात्मक केला काकडा,भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतवला।

या दोन ओळीतून देवाप्रती असलेली तळमळ, आत्मिक संवाद आणि भक्ती प्रगट होते. म्हणून आर्ततेने म्हटली जाते, तिला आरती असे म्हणतात. आरती म्हणजे, देवाला मनापासून मारलेली हाक. आरती म्हणजे तबकात अथवा ताम्हणात निरांजनातील दीप प्रज्वलीत करून देवाला ओवाळणे. ही ओवाळणी काव्यपदातून  एका विशिष्ट चालीने म्हटली जाते. या पदामध्ये साधक ईश्वराच्या रूपाचे, पराक्रमाचे, कर्तृत्वाचे वर्णन करीत असतो. विशेषत: यात देवाची स्तुती असते. आरतीमुळे उपासकांना कृतार्थतेची जाणीव होते. तो देहभान विसरून परमेश्वराला शरण येतो. यासाठी साधकांनी आरत्यांचे आत्मविष्कार साधण्यासाठी विविध प्रकार केले आहेत ते असे- काकड आरती, धुपारती, दीपारती, पंचारती, शेजारती

काकड आरती - साधक दिवसाच्या प्रारंभी पहाटेच्या वेळी परमेश्वराची आळवणी करतो, त्याला काकड आरती म्हणतात. या उपचारातून साधकाची ईश्वराविषयीची निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त होत असते. तसेच जीवनाची नित्यकर्मे तो ईश्वराला अर्पण करतो. अश्विनी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमापर्यंत मंदिरातून काकड आरती केली जाते. आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती, स्तोत्रे म्हटली जातात. संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास, संत एकनाथ आदि संतांनी केलेल्या रचना काकड आरतीनंतर गायल्या जातात.

धुपारती - धुपाने मंदिरात तसेच घरातील देव्हाऱ्यात देवाला ओवाळले जाते, त्या आरतीला धुपारती असे म्हणतात. सत्व, रज, तम हे त्रिगुण नाहीसे होऊन मनुष्याने गुणातीत व्हावे ही भावना या आरतीमागे असते. शिवाय धुपाचा वास सर्वत्र दरवळल्यामुळे त्या वासातून देवाचे अस्तित्व भासू लागते. 

दीपारती - साधक निरांजनाने देवाला ओवाळतो त्या निरांजनातील दिव्याचे तेज तो आपल्या डोळ्यात साठवत असतो. तेज हे देवाचे प्रतिक असल्यामुळे ही आरती केली असता साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात.

पंचारती - पाच वातीचे एक उपकरण असते. त्यात फुलवाती लावल्या जातात. त्यानेच साधक आपले पंचप्राण ओतून देवाला ओवाळीत असतो किंबहुना आपले प्राण देवाला समर्पण करण्याची तयारी असते विशेष म्हणजे या आरतीमुळे साधक ज्योतीस्वरूपाने देवाच्या शुद्ध प्रेमाची अनुभुति घेतो. 

शेजारती - हा दिवसातील शेवटचा उपचार असून तो रात्री केला जातो. तसे पाहता देव हा सदैव जागृत असताना शेजारती करण्याचे कारण देव हा आनंदरूपी शेजेवर आहे, याचा अनुभव आपल्याला यावा हा भाव यात असतो. द्वैत स्थिती संपून अद्वैत स्थिती प्राप्त व्हावी म्हणजेच देव व भक्त यांचे मीलन व्हावे यासाठी या आरतीचे प्रयोजन केले जाते. अशा रीतीने सकाळ संध्याकाळ व रात्रौ देवाची आरती केल्यानंतर देवाभोवती प्रदक्षिणा घालणे अगत्याचे आहे. 

प्रदक्षिणा - देवाभोवती भ्रमण करणे म्हणजे प्रदक्षिणा होय. या प्रदक्षिणेत एक सूत्र आहे ते असे की देवाच्या उजव्या बाजूने परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. याचे कारण असे की दैवी शक्ती ही मंत्राधिन असून तिचे तेजोवलय दक्षिणेकडे जात असते. प्रदक्षिणेच्या वेळी हे तेज नकळत भक्ताच्या शरीरात शिरते. त्यामुळे त्याचे मन पवित्र होऊन ते एकाग्रतेने देवासंबंधी विचार करते. म्हणजे देवाशिवाय अन्य विचार मनात देत नाहीत. थोडक्यात प्रदक्षिणा घालताना साधक देवाशी एकरूप होतो. अर्थात याला शंकराची प्रदक्षिणा अपवाद आहे. ती प्रदशिक्षणा अर्धी घातली जाते, तिला सोमसूत्री असे म्हणतात. कमीत कमी एकवीस वेळा प्रदक्षिणा घालण्याचा रिवाज आहे. यामुळे चालण्याचाही व्यायाम होतो. अशा रितीने देवपूजेचे सर्व सोपस्कार झाल्यानंतर देवाला नैवेद्य समर्पण करतात. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४