शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

नैराश्याच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी 'हा' प्रभावी उपाय आजमावून बघा आणि इतरांनाही सांगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 3:55 PM

नैराश्य आपोआप येते की आपण ओढवून घेतो? हे शोधण्यासाठी योग्य वेळी योग्य लोकांचा सल्ला गरजेचा; जसा की हा... 

एक संसारी माणूस गेले अनेक दिवस घरी चिडचिड करत होता. ऑफिस कामातही त्याचे लक्ष लागेना. कोणाशी बोलावेसे वाटेना. रोेजचे काम, डोक्यावरचे कर्ज, भविष्यातले प्रश्न यासर्वांनी तो पिचून गेला होता. बाहेरचा सगळा राग तो घरच्यांवर काढत असे. 

एक दिवस तो घरी आल्यावर बायकोने शांतपणे त्याला रागराग होण्याचे कारण विचारले. त्याच्याजवळ उत्तर नव्हते. तो एवढेच म्हणाला, की 'मला ही नैराश्याची सुरुवात आहे असे वाटत आहे. सध्या माझ्या आयुष्यात काहीच चांगले होत नाही असे सतत वाटून निरुत्साहीपणा जाणवत राहतो.'

बायको म्हणाली, `माझ्या ओळखीत एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत ते भविष्यही पाहतात. त्यांच्याशी बोलून पाहता का? ते तुमचे मानसिक प्रश्न आणि त्याचबरोबर तुमची ग्रहदशा पाहून उकल सांगतील.'

नवऱ्याला उपाय पटला. त्याने तज्ञांची भेट घेतली व आपली पत्रिका दाखवली. तज्ञांनी पत्रिकेवरून नजर टाकत म्हटले, ग्रहदशा व्यवस्थित आहे. तुमचे प्रश्न मानसिक स्थितीशी जोडले आहेत असे वाटते. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी काही विचारतो, ते सांगा.'

असे म्हणत तज्ञांनी त्या माणसाला त्यांच्या शालेय मित्रांशी संपर्क आहे का असे विचारले. त्यांच्याशी भेटीगाठी करण्याचा सल्ला दिला आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटा असे सांगितले. त्या माणसाने तसे केले. जुन्या ओळखी शोधून शालेय मित्रांची भेट घेतली. पुढच्या आठवड्यात तो पुन्हा तज्ञांना जाऊन भेटला. 

तज्ञांनी विचारले, 'शालेय मित्रांना भेटून कसे वाटले?'तो म्हणाला, 'सर, तुमचा उपाय खूपच परिणामकारक ठरला. माझ्या शालेय मित्रांपैकी अनेक जण चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. काही जण वैयक्तिक आयुष्यात सुखी आहेत तर काही दु:खी! काही जणांनी लग्नच केले नाही, तर काही जणांचे दोनदा लग्न होऊन मोडले. काही जण आजारांनी ग्रासले आहेत, तर काही जण आजाराच्या भितीने जगत आहेत. या सर्वांशी तुलना केली असता माझ्या वाट्याला यापैकी काहीच नाही. तरी मी उगीचच दु:खी होतो. पण का? हे मात्र मला कळले नाही! कृपया सांगा.'

तज्ञ म्हणाले, 'अनेकदा सुख टोचते म्हणतात, ते हेच. आपण अकारण छोटी मोठी दु:खं उगाळत बसतो. परंतु, दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावल्यावर कळते, की त्यांच्या तुलनेत आपले दु:खं काहीच नाही. मूळात हे कोणतेही दु:खं नसून काही काळासाठी मनावर आलेले मळभ आहे, ते दूर करणे आपल्या हाती आहे. त्याला नैराश्याचे लेबल लावून मिरवण्यापेक्षा लोकांशी भेटून, बोलून त्यांच्या सुखाऐवजी दु:खाशी तुलना करावी, म्हणजे आपण किती सुस्थितीत आहोत याची आपल्याला जाणीव होईल. 

म्हणतात ना, पायात चप्पल नाही याचे दु:खं करू नका, अनेकांना चप्पच दूरच, पण पायही नाहीत! म्हणून जे आहे त्यात आनंद मानायला शिका आणि मनावरचे मळभ दूर सारून नैराश्य झटकून नव्या दमाने कामाला लागा. जमलेच, तर दुसऱ्यांनाही नैराश्याच्या विळख्यातून बाहेर पडायला मदत करा. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य