शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

Tulasi Vivah 2021 : तुळशीचे पान घातलेले तीर्थ संजीवनी का मानले जाते? ते रोज प्राशन करण्यास का सांगितले जाते? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 9:30 AM

Tulasi Vivah 2021 : शहरातील फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा छोट्या घरांमध्ये तुळशी वृंदावन शक्य नसले, तरी खिडकीत शोभेच्या रोपांबरोबर तुळशीचे रोप आवर्जून लावले पाहिजे. कारण ते 'नॅचरल फिल्टर' आहे.

बहुगुणी व्यक्तिमत्त्व सर्वांनाच आवडते. त्याप्रमाणे 'तुळस' देखील बहुगुणी आहे, म्हणूनच ती भगवान महाविष्णूंना, विठोबाला, जगन्नाथाला, श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. तुळस हे लक्ष्मीचेच रूप. तुळशीची पूजा केली, की लक्ष्मी प्रसन्न होणार आणि लक्ष्मी प्रसन्न झाली, की लक्ष्मीपतींची कृपादृष्टी नक्कीच होणार. म्हणूनच सर्व देवतांच्या कृपाशिर्वादासाठी आधी तुळशीचे पूजन करा. कारण ती संजीवनी आहे.  तुलसी विवाह निमित्ताने थोडे तुलसी महात्म्यदेखील समजून घेऊया. 

तुळशीपूजनाचा उपयोग काय?निरामय आरोग्यासाठी नित्यसेवन करावी अशी वनस्पती. तिचे महात्म्य एका श्लोकात दिले आहे,

तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठति।तद्गृहं तीर्थभूतं हि नायांति यमकिंकरा।।

म्हणजे, ज्या घरात, दारात तुळशीचे रोप फोफावले असते, बहरले असते, असे घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे. अशा घरात यमाचे दूत म्हणजे रोग, रोगजंतू येत नाहीत. तुळशीचा गंध वाऱ्याने जिथपर्यंत जोतो, तिथपर्यंतच्या दाही दिशातील प्रदेश शुद्ध होतो. रोगजंतुरहित होतो. तुळशीच्या आसपासची दोन मैलांची जागा गंगाजलाइतकी शुद्ध व पावन होते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. 

पुण्यातील तुळशीचे जंगल 

डेक्कन जिमखाना कॉलनी वसवली, त्यावेळी भांडारकर संशोधन मंदिराच्या जवळच्या कॅनॉलच्या बाजूला मलेरियाची मोठ्या प्रमाणात साथ होती. त्यावर काय उपाय करावा, हा नगरपालिकेपुढे मोठा प्रश्न होता. त्यावेळी सुप्रसिद्ध वैद्य कै. गणेशशास्त्री नानल यांनी त्या बाजूला तुळशी लावल्यास मलेरिया नष्ट होईल, अशी सूचना केली व पुणे नगरपालिकेने तुळशीचे रानच्या रान लावले. काही काळातच मलेरिया त्वरेने नष्ट झाला, असा किस्सा श्रीम. सुधा धामणकर लिखित 'का, कशासाठी?' या पुस्तकात आढळतो.

तुळशीचे तीर्थ म्हणजे संजीवनीच!

तुळशी दुसरी संजीवनीच आहे. तिचे नित्य सेवन व्हावे, म्हणून आपल्या पूर्वजांनी तीर्थात तुळशीची पाने टाकून तुळशीउदक प्राशन करण्याची सवय लावून दिली. कारण, तुळशीची पाने टाकलेले तीर्थ नियमित प्राशन करणाऱ्याला ताप व मलेरिया होणार नाही. तुळशीच्या काढ्यामुळे लगेच घाम येऊन ताप उतरतो. घराजवळ तुळशीचे जंगल असेल, तर तिथे वीज पडू शकत नाही, असंही मानतात. आजही ग्रामीण भागात घराबाहेर तुळशी वृंदावन आढळते.

शहरातील फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा छोट्या घरांमध्ये तुळशी वृंदावन शक्य नसले, तरी खिडकीत शोभेच्या रोपांबरोबर तुळशीचे रोप आवर्जून लावले पाहिजे. कारण ते `नॅचरल फिल्टर' आहे.

तुळशी माहात्म्य सांगावे, तेवढे थोडेच. त्याचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे आहेतच. परंतु, हेतू, स्वार्थ बाजूला ठेवून एखाद्या सायंकाळी तुळशीजवळ दिव्याची मंद ज्योत तेवताना बघा, अंतरीचा दिवा प्रज्वलित झाल्यावाचून राहाणार नाही. म्हणूनच तर, तिन्ही सांजेला दिवा लागला, की आपण 'शुभंकरोति कल्याणम्' ही प्रार्थना करतो. त्यात तुळशीचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे, 

दिवा लावला देवापाशी, उजेड पडला 'तुळशीपाशी' (काही जण विष्णूपाशी असेही म्हणतात, मात्र आशय तोच!)माझा नमस्कार, सर्व देवा तुमच्या पायापाशी।