गणपती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती शुभ लाभाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे त्यांना योग्य दिशेने नेणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास विशेष लाभ आणि धनप्राप्ती होते, असं शास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे. गणपती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणं उत्तम मानलं जातं ते पाहुया.
हिंदू धर्माच्या मान्यतांनुसार गणरायाला ज्ञानाची देवता म्हटले जाते आणि देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. दोघांनाही देवघरात एकत्र ठेवले जाते. दीपावली आणि अक्षय्य तृतीया यांसारख्या विशेष शुभ मुहूर्तावर त्यांची विशेष पूजाही केली जाते. असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीकडे ज्ञानाची कमतरता असेल तर तो धनाचा वापर चुकीच्या कामात करू शकतो, म्हणून गणरायाला आणि देवी लक्ष्मीला पूजास्थानी एकत्र ठेवले जाते.
देवाऱ्यात गणरायाची आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती एकत्र ठेवल्ली जाते. पौराणिक मान्यतेनुसार देवाऱ्यात गणरायाची आणि देवी लक्ष्मीची मूर्ती उत्तर दिशेला ठेवावी. या श्रद्धेमागेही एक आख्यायिका आहे. यानुसार एकदा भगवान शंकरानं क्रोधित होऊन गणरायाचे मस्तक शरीरापासून वेगळे केले. परंतु जेव्हा त्यांना हा आपलाच पुत्र असल्याचं समजलं, तेव्हा त्यांनी उत्तर दिशेला आपले दूत पाठवले आणि या दिशेला जो पहिला सापडेल, त्याचे फक्त शिर आणण्यास घेऊन येण्यास सांगितलं. भगवान शंकराच्या आज्ञेचं पालन करत त्यांचे दूत ऐरावत हत्तीचं शिर घेऊन आले. उत्तर दिशेलाच शिर पहिलं मिळाल्यानं गणरायालाही ठेवण्यासाठी उत्तर दिशा शुभ मानली जाते.
अनेकवेळा असंही घडतं की लोक नकळत देवी लक्ष्मीची मूर्ती गणेरायाच्या डाव्या बाजूला ठेवतात. असं केल्याने घराच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे देवी लक्ष्मीची मूर्ती गणेशाच्या उजव्या बाजूला ठेवावी.