शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Valentines Day 2022 : व्हॅलेंटाईन डे तोंडावर असताना घरात वादावाद? 'या' वास्तूटिप्स फॉलो करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 2:48 PM

असे म्हटले जाते की ते प्रेम करणे सोपे आहे, परंतु प्रेम मिळविणे कठीण आणि मिळाले तर टिकवून ठेवणे त्याहून ...

असे म्हटले जाते की ते प्रेम करणे सोपे आहे, परंतु प्रेम मिळविणे कठीण आणि मिळाले तर टिकवून ठेवणे त्याहून कठीण आहे. या सर्व अडचणींवर मात केल्यानंतर, लोक प्रेम विवाह करतात परंतु तरीही ते आनंदी नाहीत असे दिसून येते. २४ तास एकत्र राहिल्यानंतर, ते एकमेकांचे दोष काढण्यास सुरुवात करतात आणि त्यांच्यामध्ये क्षणो क्षणी भांडणे सुरू होतात. ही भांडणं लुटुपुटुची असतील तर ठीक, पण या वादांनी टोक गाठले, तर प्रेमभंग आणि पुढे विवाहभंग होण्यापर्यंत मजल जाते. अशातच व्हॅलेंटाईन डे तोंडावर आहे, संबंध जग प्रेमाच्या आणाभाका घेत असताना आपल्या घरातले वाद टाळायचे असतील तर पुढे दिलेल्या वास्तू टिप्स वापरून बघा. 

या उपायांसह विवाहातील समस्या दूर करा 

>> लग्नानंतर रोजचे वाद होत असतील, तर गरजूंना कणिक आणि तेलाचे दान करा. हा उपाय केवळ प्रेम विवाह झालेल्यांनाच नाही तर ठरवून विवाह केलेल्यांनाही वापरता येईल. या उपायाने वाद कमी होऊन परस्परांचे संगनमत होण्यास मदत होते. मात्र हे दान करताना नवरा बायको एकत्र असणे गरजेचे आहे. 

>> लग्नसंबंध पुन्हा सुधारण्यासाठी तुम्ही जोडीदाराला एखादी भेट वस्तू देणार असाल, तर ती वस्तू काळया किंवा निळ्या रंगाची असणार नाही याची काळजी घ्या. हे रंग नात्यावर नकारात्मक परिणाम करतात. 

>> दररोज मीठ मिश्रित पाण्याने फरशी पुसा. याशिवाय रोज सायंकाळी कापूर जाळण्याने नकारात्मक उर्जा दूर होईल. 

>> दर शुक्रवारी राधा-कृष्णाच्या मंदिरात जा. तेथे पिवळ्या रंगाची फुले व खडीसाखर अर्पण करा, यामुळे विवाहातील अडचणी दूर होतील.

>> आपल्या शयन कक्षात अर्थात बेडरूममध्ये राधा कृष्णाची मूर्ती, तसबीर किंवा मोरपीस लावा. त्यामुळेही सकारात्मक वातावरण होऊन वाद निवळतो. 

>> बेडरूममध्ये घरात वापरण्याच्या चपलाही वापरू नका. त्या खोलीबाहेर ठेवा. तसेच मोबाईल, लॅपटॉप इ. गॅझेट खोलीबाहेर ठेवून नात्याला वेळ द्या. 

>> सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांना वेळ द्या, बोला, एकमेकांच्या गरजा समजून घ्या आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपोआपच गृह कलह कमी होतील आणि घरात दररोज व्हॅलेंटाईन डे साजरा करता  येईल!

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेVastu shastraवास्तुशास्त्रrelationshipरिलेशनशिप