शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

Valetines Day 2023: प्रेम म्हणजे काय? तर जगण्यातला आनंद शोधण्याचा प्रवास; हा आनंदसोहळा रोज साजरा करा!- ओशो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:20 AM

Valentines Day 2023: प्रेम मिळवता येत नाही, ते अनुभवावं लागतं, त्याचा शोध कुठे आणि कसा घ्यायचा हे सांगताहेत जीवन रहस्य उलगडून दाखवणारे ओशो!

कमळ आणि चिखल यांच्यात काही संबंध दिसत नाही. पण संबंध आहे. चिखल माती ही जन्मदात्री आहे. ते गर्भाशय आहे. त्यात कमळाचा गर्भ धरतो. आणि मग जन्म होतो. ही पृथ्वी भलेही मृण्मय असेल, पण विसरू नका, यातून कमळ उमलण्याची शक्यता आहे. अनेक लोक चिखल म्हणत या पृथ्वीची निंदा करतात आणि ते निंदा करण्यात एवढे मग्न होतात, की त्यांना याच निंदेतून आशा अपेक्षांचे कमळ उमलताना दिसतच नाही. 

मी तुम्हाला कमळाची आठवण करून देत आहे. चिखलाची निंदा करण्याच्या भानगडीत न पडता कमळांचा शोध घ्या. ज्या दिवशी तुम्हाला चिखलात कमळ आढळतील त्या दिवशी या चिखल मातीचे आभार मानायला विसराल का? त्या दिवशी परमात्मा वसत असलेल्या या देहाला धन्यवाद देणार नाही का? त्या दिवशी या पार्थिव जगाबद्दल तुमचं हृदय अनुग्रहाने भरून जाणार नाही का? या पार्थिव जगात परमात्म्याचा अनुभव येतो त्या पार्थिव जगाची निंदा करू शकाल का?

तुमच्या मनात या जगाबद्दल प्रेम भरून ओसंडावं अशी माझी इच्छा आहे. या प्रपंचाचा निषेध करणाऱ्या जुन्यापुराण्या धारणांचे संस्कार समूळ उपटून टाकावेत असे मला वाटते. त्यांना पार पुसून टाका. परमात्म्याला बघण्यापासून, जाणण्यापासून ते तुम्हाला अडवत आहेत. दूर ठेवत आहेत. तुम्ही नाचाल तर त्याला बघू शकाल. नृत्यात तो अत्यंत जवळ असतो. तुम्ही गुणगुत गा, म्हणजे तो सुद्धा तुमच्यासोबत गुणगुणेल. 

मी गीत शिकवतो. संगीत शिकवतो. माझा हेतू एकच आहे. आनंद, उत्सव, महोत्सव! उत्सव महोत्सवाचे सिद्धांत बनवता येत नाहीत. ही केवल जीवनचर्या होऊ शकते. तुमचं जीवनच ते सांगू शकेल. केवळ ओठांनी बोलाल तर ते पोकळ होईल. खोटं वाटेल. आतून प्राणातून बोला. श्वासानी सांगा. आनंद उत्सव महोत्सव रोमारोमात भरू द्या.या पृथ्वीवरील आनंदाच्या मंदिराने फार पूर्वी इथला निरोप घेतला आहे. कधी कृष्णाने बासरी वाजवली तेव्हा ते अस्तित्त्वात असेल. मग कुणास ठाऊक कोणत्या तरी दुर्दैवी घडीला, कुणास ठाऊक कोणत्या निराशेच्या भरात, कोणत्या तरी नपुंसक लोकांच्या हाती आम्ही आपले जीवन सोपावले. पोकळ पंडितांच्या हाती आमचे जीवन घडले. त्यांनी आमचा गळा दोरीच्या फासात आवळला. मोठाली शास्त्रं गळ्यात अडकवली. चालणे मुश्किल झाले. नाचणे दूर राहिले. मोठाले सिद्धांत त्यांनी आमच्या गळी उतरवले. त्यामुळे गळा अवरुद्ध झाला. अशा स्थितीत गीत कसे गाणार?

शास्त्र, सिद्धांत, संप्रदाय मी तुमच्याकडून हिसकावून दूर भिरकावणार आहे. तुमची ओझी मला उतरवून ठेवायची आहेत. तुम्हाला मुक्त करायचे आहे. इतके हलके करायच आहे की तुम्ही पंख पसरून मनमोकळेपणी आकाशात उडू शकाल. मुक्तीचा आनंद लुटू शकला. हे आकाश तुमचे आहे. स्वच्छंद झेप घ्या आणि त्यात मनसोक्त विहार करा. 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे