शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मिरातील किश्तवाड येथे दहशतवाद्यांसोबत चकमक, दोन जवानांना हौतात्म्य, दोन जखमी
2
खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये राजकीय भेटीगाठी
3
जगातील सर्वात शक्तीशाली बॉडीबिल्डरचा केवळ 36 व्या वर्षी हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू; पत्नीनं सांगिलं, शेवटच्या क्षणी काय घडलं? 
4
45 देशांच्या क्षेत्रफळाहूनही अधिक...,15 वर्षांत झाली डबल...; वक्फ बोर्डाकडे किती संपत्ती? जाणून डोकं चक्रावेल
5
पहिला मान गुजरातला! ३ हजार वंदे मेट्रो सुरू होणार; ‘या’ मार्गावरील सेवेचे तिकीट फक्त ३०₹
6
अनंत-राधिकासह लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले मुकेश अंबानी, सून श्लोकाही दिसली सोबत -  बघा Video
7
मराठा आरक्षणावर CM शिंदे,जरांगे पाटील ताेडगा काढतील; OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही - बावनकुळे
8
केजरीवाल 177 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर, समर्थकांकडून जोरदार स्वागत; म्हणाले- यांचे कारागृहदेखील...
9
"आयुष्य खटाखट नाही..."; जयशंकर यांचा राहुल गांधींवर निशाणा, स्पष्टच बोलले
10
म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी ८ ऑक्टोबरला, अशी आहे उत्पन्न गटानुसार घरांची संख्या 
11
"मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून"; मंत्री उदय सामंतांनी थेटच सांगितलं
12
शेख हसीना देशात परत जाणार? बांगलादेशात व्हायरल 'कॉल'ची चर्चा; नेमकं प्रकरण काय?
13
“आरक्षणविरोधी राहुल गांधी अन् काँग्रेसचा खरा चेहरा उघड, जनताच आता उत्तर देईल”; भाजपाची टीका
14
आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी? काँग्रेसचा सवाल
15
“देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा...”; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ
16
“१३ महिन्यांच्या वाजपेयी सरकारची लवकरच पुनरावृत्ती, मोदींची खुर्ची डळमळीत”:पृथ्वीराज चव्हाण
17
“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला
18
शत्रूचं ड्रोन अन् फायटर जेटच्याही हवेतच उडणार चिंधाड्या, भारतानं तयार केलं 'अप्रतिम' क्षेपणास्त्र!
19
"आनंदाचा शिधाच्या नावाखाली आनंदाचा मलिदा हे सरकार खातंय"; काँग्रेसचा महायुतीवर मोठा आरोप
20
“फडणवीसांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले, आता सुट्टी नाही; हिशोब घ्यायचा”: मनोज जरांगे

Vaman Jayanti 2022: पूर्वापार चालणारा वामन जयंतीचा उत्सव आधुनिक स्वरूपात कसा करावा हे जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 6:01 PM

Vaman Jayanti 2022: परंपरेची नाळ जेव्हा आधुनिकतेशी जोडली जाते, तेव्हा संस्कृती वृद्धिंगत होत जाते!

देवांचे इंद्रपद बळीराजापासून पुन्हा मिळवून देण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनावतार घेतला. वामनाचा जन्म भाद्रपद शुक्ल द्वादशीला श्रवण नक्षत्रावर झाला, असे भागवत पुराणात नमूद केले आहे. यंदा ७ सप्टेंबर रोजी वामन जयंती (Waman Jayanti 2022)आहे. त्यानिमित्त जाणून घेऊ या दिवसाचे पौराणिक आणि आधुनिक दृष्टीने महत्त्व!

पूर्वीच्या काळी वामन जयंतीचे व्रत लोक करत असत. मात्र अलिकडे या व्रताबद्दल फार कमी जणांना माहिती असते. आपणही ज्ञानात भर म्हणून हे व्रत कसे असते, त्याचा विधी काय असतो ते जाणून घेऊ आणि सद्यस्थितीशी त्याची सांगड कशी घालता येईल, ते पाहू. 

वामनाचा जन्म माध्यान्ही झाला. म्हणून वामनाच्या पूजेचा संकल्प माध्यान्ह उलटून गेल्यानंतर केला जातो. नद्यांच्या संगमावर स्नान करून नंतर एक घट पाणी भरून घरी आणाावा. सुयोग्य जागी त्या घटाची स्थापना करावी. घटामध्ये पंचरत्ने घालावी. घटावर आपल्या शक्तीनुसार जे पूर्णपात्र उपलब्ध असेल त्यामध्ये तीळ, गहू, जव यापैकी एक धान्य भरून त्यावर कोऱ्या वस्त्राच्या घडीवर वामनाची प्रतिमा स्थापन करावी. प्रतिमेच्या पुढे वामनप्रित्यर्थ म्हणून दंड, कमंडलू, छत्र, पादुका आणि अक्षमाला ठेवावी. नंतर विधिवत षोडशोपचारी पूजा करावी. वामनाचे ध्यान करावे. रात्री जागरण करावे. सकाळी उत्तरपूजा करून देवाचे विसर्जन करावे. त्यामधील वामनाची प्रतिमा, वस्त्र, दक्षिणेसह पुरोहितांना दान द्यावे. तसेच अतिथीला भोजन, वस्त्र, उपयुक्त वस्तुचे दान करावे.

वामनाच्या तीन पावलांचे प्रतीक म्हणून तीन पुरोहितांना दहीभाताचे भोजन देण्याची परंपरा असावी. हे दान म्हणजे भगवान विष्णूंना केलेले दान आहे असे समजले जाते. बारा वर्षे हे व्रत आचरले जाते. परंतु, अलिकडच्या काळात या व्रताचे आचरण करणे सर्वांना जमेलच असे नाही. त्यामुळे ज्यांना विधीवत हे व्रत करणे शक्य नाही, त्यांनी या दिवशी वामन अवताराची कथा वाचून विष्णूंच्या कार्याची महती जाणून घ्यावी. खोबरे, खडीसाखर, साखरफुटाणे यांचा नैवेद्य दाखवून लहान मुलांना हा खाऊ वाटावा. मुलांमध्ये वामनाची बटू मूर्ती पाहावी, त्यांना संतुष्ट करावे, त्यांनाही वामनाची गोष्ट सांगून आपल्या संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि यथाशक्ती दानधर्म करावा. तसे करणे धर्मशास्त्राला अभिप्रेत आहे.