शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Varuthini Ekadashi 2023: वरुथिनी एकादशीनिमित्त जाणून घ्या बांधवगडच्या उद्यानातील विष्णूंच्या भव्य मूर्तीबद्दल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 5:48 PM

Varuthini Ekadashi 2023: विष्णूंची ही मूर्ती अति प्राचीन असल्याचे सांगितले जाते, अनेक भाविक तिथे व्याघ्रप्रकल्प, किल्ला आणि विष्णूंची भव्य मूर्ती पाहण्यास जातात. 

बांधवगढ राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यातील उमरिया जिल्ह्यात आहे. १९६८ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. हे मध्य प्रदेशातील एक असे राष्ट्रीय उद्यान आहे जे ३२ टेकड्यांनी वेढलेले आहे. या ठिकाणी अनेक फळांची व फुलांची झाडे आहेत, वाघाखेरीज अनेक प्राणीही आढळतात जे सहज पाहता येतात आणि इतर अनेक प्राणी व पक्षीही येथे आढळतात. त्याबरोबरच तेथील भव्य विष्णू मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. 

बांधवगड हे फक्त वाघांसाठी प्रसिद्ध असले तरी या ठिकाणी अनेक भाविक विष्णूमूर्तीच्या दर्शनासाठी देखील येतात. बाधवगड नॅशनल पार्कमधील डोंगरावर असलेले शेष शैय्या हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला पायी जावे लागते. येथे भगवान विष्णू निद्रावस्थेत पहुडले आहेत. या मूर्तीची रचना अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध आहे. शिवपुराण आणि नारद-पुराणातही त्याचा उल्लेख आहे.

शेष शय्या बांधवगढ:

बांधवगडच्या टेकडीवर २ हजार वर्षे जुना किल्ला बांधला आहे, या किल्ल्याचे नाव शिवपुराणात आढळते. गडाचे बांधकाम कोणी केले? आजही याबाबत शंका आहेत. येथे शेषशैया हे प्रसिद्ध ठिकाण आहे.भगवान विष्णूची महाकाय मूर्ती अतिशय आकर्षक आणि रहस्यमय आहे. भगवान विष्णूची ही मूर्ती ६५ फूट लांब आहे. 

आत्तापर्यंत तुम्ही भगवान विष्णूच्या अनेक मूर्ती पाहिल्या असतील. क्षीरसागरमध्ये विश्रांतीच्या मुद्रेत त्याचे रूप क्वचितच दिसते. भगवान विष्णू इथे सात फणा असलेल्या नागावर म्हणजेच शेष नागावर निद्रावस्थेत विराजमान आहेत. चरणगंगा ही येथील मुख्य नदी आहे जी उद्यानातून जाते. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार चरणगंगा नदीचा उगम भगवान विष्णूच्या चरणकमलातून झाला. त्यामुळे या नदीचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते, हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने दिवाळीनिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

बांधवगड शेषशैया येथे वर्षातून एकदा जन्माष्टमीच्या वेळी येथे भव्य जत्रा भरते. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तिथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची इच्छा भगवान विष्णू पूर्ण करतात. वर्षातून एकदा भरणाऱ्या या जत्रेत हजारो लोक पोहोचतात. राष्ट्रीय उद्यानातील बांधवगड टेकडीवर असलेला बांधवगड किल्ला आणि शेषशैया हे या ठिकाणचे प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. राजवाड्यातून आजूबाजूची झाडे, वनस्पती आणि प्राणी यांचे दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करून सोडते. आता बांधवगड किल्ला आणि व्याघ्र प्रकल्प एकत्र आले असले तरी श्रद्धा आणि प्रेक्षणीय स्थळ यांचा अनोखा संगम इथे पाहायला मिळतो.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स