शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Varuthini Ekadashi 2024: तुमची बिघडलेली ग्रहदशादेखील होईल ठीक; करा वरुथिनी एकादशीचे व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 7:00 AM

Varuthini Ekadashi 2024: चैत्र मासातील वरुथिनी एकादशी आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे क्षालन करते; त्याबद्दल सविस्तर माहिती. 

शनिवारी ४ मे रोजी वरुथिनी एकादशी आहे. चैत्र कृष्ण एकादशीला 'वरुथिनी एकादशी' असे नाव आहे. आपल्याकडे प्रत्येक एकादशीची एक वेगळी कथा आहे. धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला 'एखादे प्रभावी व्रत सांगा' अशी विनंती केली आणि विनंतीनुसार श्रीकृष्णाने हे व्रत धर्मराजाला सांगितले, अशी कथा आहे. हे व्रत पापनाशक आणि इहपरलोकी सुख समाधान देणारे आहे. या व्रताच्या प्रभावाबद्दल आणखीही अनेक कथा ग्रंथांतरी नमूद आहेत. त्यापैकी एक कथा अशी- 

काशीमध्ये राहणाऱ्या एका ब्राह्मणाला तीन मुलगे होते. त्यांच्यातील सर्वात मोठा मुलगा दुर्गुणी, दुराचारी होता. ब्राह्मण रोज भिक्षा मागून कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. कालांतराने तो आजारी पडला. तेव्हा त्याने या तिन्ही मुलांना भिक्षेसाठी जाण्याचा परिपाठ दिला. त्याच वेळी त्यांना वेदाध्ययन करण्याचा सल्लाही दिला. त्याच्या सांगण्यावरून दोन मुलांनी वेदाध्ययन केले. नंतर ते दोघे आपला उदरनिर्वाह अतिशय मानाने करू लागले. मोठा मात्र काही न करता तसाच राहिला. इतकेच नव्हे, तर एका मुलीला फसवून घरी घेऊन आला. त्यावेळी ब्राह्मणाने त्याला घराबाहेर काढले. तो मुलगा दुसऱ्या गावी दारिद्रयात राहू लागला. एक दिवशी त्याच्या लहान भावाने त्याला `वरुथिनी एकादशी'चे व्रत करण्यास उद्युक्त केले. यथाकाल वडिलांनी त्याला पुन्हा घरात घेतले.

दुसऱ्या कथेनुसार कुशवती नगरीमध्ये महोदय नामक एक श्रीमान वाणी राहत होता. त्याने हे वरुथिनी एकादशीचे व्रत मोठ्या श्रद्धेने केले. त्याचे फळ त्याला मिळाले. तो त्या नगरीचा राजा झाला. त्याने आपल्या प्रजेला या व्रताचे महात्म्य सांगून सर्वांनाच हे व्रत करण्याचे आवाहन केले. त्याच्या शब्दाला मान देऊन त्याप्रमाणे हे व्रत केले. त्यामुळे त्याच्या राज्यात दु:खी, गरीब असे कोणीच राहिले नाही. सारेच सुखी व समाधानी जीवन व्यतीत करू लागले.

वरील दोन्ही कथांवरून लक्षात येते, की वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे ग्रहदशा पालटण्यास मदत होते. परंतु, केवळ हे कारण पुरेसे नाही, तर ही प्रयत्नांना उपासनेची जोड आहे. केवळ व्रत करून यशस्वी होता आले असते, तर कोणी प्रयत्न केलेच नसते. परंतु, अशा प्रकारची उपासना आपले मन एकाग्र करण्यास मदत करते. प्रापंचिक विषयातून मन दूर करून आपल्या ध्येयावर केंद्रित करण्यास मदत करते. एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळचा उपास हा वासनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुचवलेला उपाय आहे. तोंडावर ताबा ठेवला की आपोआप मनावर ताबा येतो. मन शांत असले की ध्येयाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो.  ही महती आहे एकादशीची! महिन्यातून दोनदा हे व्रत येते. ते भक्तिभावाने केले असता, त्याचे अनेक लाभ होतात.

व्रताचरण : एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे. पिवळी फुले वाहावीत. चंदन लावावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी. त्यानंतर विष्णु सहस्रनामाच्या पठणासह एकादशी व्रताची कथा वाचावी. शेवटी आरती करावी. दिवसभर ईश्वराचे स्मरण ठेवून आपले दैनंदिन कार्य करावे. आणि एकादशीच्या दिवशी फळ खाऊन द्वादशीला पुनश्च विष्णू पूजा करून उपास सोडावा. उपास आणि साग्रसंगीत पूजा शक्य नसेल तर किमान १०८ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करावा.

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३