वास्तू आणि आरोग्य यांचा परस्पराशी घनिष्ट संबंध आहे. एकाशिवाय दुसऱ्याला पूर्णत्त्व नाही. या दोन्हीची नीट काळजी कशी घ्यावी यासाठी आज दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत वास्तू तज्ञ डॉ. रविराज अहिरराव.
'हेल्थ इज वेल्थ' असा इंग्रजी वाकप्रचार आहे. आरोग्याला श्रीमंती म्हणून गणले आहे. पण या दृष्टीने आपण सहसा विचार करत नाही. पैशांना सर्वकाही मानतो. पण तेच पैसे कमवण्याच्या नादात आरोग्याची हेळसांड होऊ लागली, की कमावलेला पैसा पाण्यासारखा खर्च होतो. त्यामुळे आरोग्याची चावी हातात असेल तर श्रीमंतीची इतर दारं उघडायला वेळ लागणार नाही. याउलट आरोग्यच्याच तक्रारी वारंवार भेडसावत असतील तर सगळी सुखं असूनही त्यांचा आनंद घेता येणार नाही.हे सुख पुरेपूर उपभोगता यावे यासाठी आरोग्या बरोबर वास्तुशास्त्राच्या टिप्सदेखील उपयुक्त पडतात.
या टिप्स जेव्हा जाणकारांकडून मिळतात तेव्हा समस्यांवर अचूक तोडगा सापडतो आणि गुणदेखील येतो. म्हणून डॉ. अहिरराव यांच्याकडून मोफत मिळणारे मार्गदर्शन चुकवू नका. या संधीचा तुम्ही लाभ घ्या आणि इतरांनाही माहिती द्या.
२९ जुलै पासून श्रावणाच्या मुहूर्तावर दर शुक्रवारी वास्तूतज्ञ डॉ. रविराज अहिरराव दुपारी ३ वाजता आपल्या भेटीला लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर येत आहेत. तिथे आपल्याला वैयक्तिक तसेच व्यावसायिक अडचणींवर तोडगे जाणून घेता येणार आहेत, ते ही अगदी मोफत!