स्वच्छता जिथे लक्ष्मी वसे तिथे! हे आपण ऐकले असेलच. म्हणजेच आर्थिक स्थिरता तसेच आरोग्य यांचा घराच्या टॉयलेट-बाथरूमशी जवळचा संबंध असतो. त्यासाठी स्वच्छतेबरोबर कोणती खबरदारी घ्यायला हवी, यावर आज दुपारी ३ वाजता वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, तेही आपल्या लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर!
तुमचे घर कितीही स्वच्छ असू द्या, पण टॉयलेट बाथरूम स्वच्छ नसेल तर तुमची वास्तू कधीच तुम्हाला लाभ देणार नाही हे लक्षात ठेवा. घरातले टॉयलेट बाथरूम यावर आरोग्य आणि आर्थिक बाबी अवलंबून असतात. त्यामुळे दैनंदिन कामात या दोन्हीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. याशिवाय वास्तू रचना करताना टॉयलेट, बाथरूमची दिशा चुकीची असेल किंवा त्याच्या विरुद्ध दिशेला किचन, देवघर, बेडरूम यांची रचना केलेली असेल तर कोणती दक्षता घ्यायला हवी. कोणते उपाय केले असता घरात रोगराई शिरणार नाही व वास्तू दोष उद्भवणार नाहीत, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आज दुपारी लोकमत भक्तीच्या युट्युब चॅनेलला भेट द्यायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा.
वास्तुशास्त्राशी संबंधित आणखीही विषयावरील मोफत माहिती मिळवण्यासाठी लोकमत भक्तीचे युट्युब चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा!