पैसा कितीही कमवा, तो कमीच पडतो! कारण दरदिवशी वाढत्या गरजा, समस्या आणि महागाई यांच्याबरोबर खर्चाचा ताळमेळ बसवताना दमछाक होते. आपल्या वास्तूमध्ये पैसा यावा आणि तो दीर्घकाळ टिकावा, वाढावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी वास्तू टिप्सची मदत कशी होईल ते आज जाणून घेऊ.
लक्ष्मी चंचल असते. ती बाहेर जाण्यासाठी धडपडत असते. तिचा मुक्काम घरात वाढावा म्हणून वास्तू शास्त्राशी निगडित काही गोष्टींची काळजी घेणे अनिवार्य असते. अन्यथा आर्थिक स्थिती गळक्या माठाप्रमाणे होईल. माठात पाण्याची भर घालत राहाल आणि तळाला छिद्र असेल तर जसे पाणी टिकणार नाही, तसेच वास्तुदोष असतील आणि तुम्ही अपार मेहनत करून पैसे घरात साठवत असाल तर पैसा देखील टिकणार नाही.
यासाठी घरात नेमके कोणते बदल करावेत, कोणत्या चुका टाळाव्यात, काय उपाय करावेत, याचे मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलला जॉईन व्हा. वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव वास्तुशास्त्र आणि पैसे यांचा परस्परसंबंध या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उपयुक्त टिप्स देखील सांगणार आहेत.
वास्तूशी निगडित अन्यही विषयांवर माहिती मिळवण्यासाठी लोकमत भक्तीचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा आणि मोफत मार्गदर्शन मिळवा.