शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला ठेवा गजमूर्ती, धनाचा पडेल पाऊस होईल अपेक्षांची पूर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 4:06 PM

Vastu Tips: वास्तुशास्त्रात गजमूर्ती शुभ मानली जाते. घर-ऑफिस किंवा व्यावसायिक ठिकाणी योग्य दिशेला ठेवलेली गजमूर्ती कोणकोणते लाभ देते, जाणून घ्या!

हत्ती हे जसे इंद्राचे वाहन तसे श्रीलक्ष्मीचेही वाहन! हत्तीवर आरूढ झालेली लक्ष्मी गजलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. तिला वैभवाचे प्रतीक मानले जाते. म्हणून हत्ती हे उच्च पद, प्रतिष्ठा, सन्मान आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रात हत्तीला अत्यंत महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. एवढेच नाही तर चिनी वास्तुशास्त्र फेंगशुईमध्ये हत्तीला खूप शुभ मानले जाते. वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेम बहरत राहावे यासाठीही गजमूर्तीचा पर्याय सांगितला जातो. त्यामुळे आपणही गजमूर्तीचा लाभ कोणत्या कामासाठी व कसा करून घ्यायचा ते जाणून घेऊ. 

मान-सन्मान मिळवण्याचा उपाय : जर तुम्हाला तुमच्या जीवनात खूप मान-सन्मान मिळवायचा असेल तर वास्तुशास्त्रानुसार लाल रंगाची गजमूर्ती घराच्या किंवा ऑफिसच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला ठेवा. यामुळे तुमची भरपूर प्रगती होईल आणि पैसा मिळेल. व्यावसायिकांची कीर्ती वाढेल. 

सकारात्मकता समृद्धी वाढवण्याचा उपाय: जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवायची असेल, जर तुम्हाला भरपूर संपत्ती आणि समृद्धी मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या टेबलावर चांदीची गजमूर्ती ठेवा. ती मूर्ती उत्तर दिशेला ठेवणे हितकारक ठरेल. व्यावसायिकांनी ती मूर्ती तिजोरीत ठेवावी. 

वैवाहिक जीवनात आनंद मिळवण्याचा उपाय : पती-पत्नीमध्ये वारंवार मतभेद होत असतील तर बेडरूममध्ये हत्ती आणि हत्तीची जोडी ठेवा. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो. तणाव दूर होतो. मात्र यावेळी लक्षात ठेवा की हत्ती आणि हत्तीचे तोंड एकमेकांकडे असावे.

जीवनात यश मिळवण्याचे मार्ग: जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल किंवा तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण करायचे असेल. घराच्या मुख्य दारावर हत्तीचे सोंड उंचावलेले चित्र लावा किंवा प्रवेश द्वारावर सोंड उंचावलेली मूर्ती ठेवा. यामुळे तुमच्या घरावर सुखाचा वर्षाव होईल आणि जीवनात यश, कीर्ती, समृद्धी मिळेल. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र