आजकाल घरांमध्ये फेंगशुईचा ट्रेंड खूप वाढला आहे. लव्ह बर्ड्स, लाफिंग बुद्धा, क्रिस्टल, कासव, विंड चाइम अशा अनेक वस्तू आहेत ज्यांचा वापर घरांमध्ये फेंगशुईच्या नावाने केला जात आहे. फेंगशुईमध्ये या सर्व गोष्टी शुभ आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या मानल्या जातात. फेंगशुईमध्ये कौटुंबिक नात्यांमध्ये परस्पर प्रेम वाढवण्यासाठी उपायही सांगितले जातात. ते उपाय करून बघा, तुम्हाला निश्चित लाभ होईल...
>> विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप अशी इलेक्ट्रॉनिक गॅझेट ठेवू नये. त्या गोष्टींच्या अतिवापराने संवाद प्रक्रियेत अडथळा येतो.
>> बेडरुममध्ये कोणत्याही प्रकारचे विभाजन असल्यास, छताला दोन भागांमध्ये विभाजित करणारे तुळई किंवा पलंगाचे दोन भागांमध्ये विभाजन करणारी बॉक्स पलंग रचना, गादी या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. फेंगशुईनुसार, बेड आणि गादी अखंड असावी. यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल.
>> बेडरूममध्ये नदी, तलाव, धबधबा आणि विहीर अशी पाण्याशी संबंधित चित्रही ठेवू नये. पाणी प्रवाही असते, स्थिर नसते, परंतु नात्यात स्थिरता नसेल तर नाते दुभंगते, म्हणून अशी चित्रे काढून टाकावीत.
>> शौचालयाचा दरवाजा बेडच्या समोर नसावा. तसे असल्यास, तो नेहमी बंद ठेवा.
>> जर बेडरूममध्ये आरसा असेल तर तुमचा बेड त्यामध्ये दिसू नये अशा बेताने त्याची रचना करा. जर आरसा काढणे कठीण असेल तर त्यावर पडदा लावा.
>> बेडचा शेवट खिडकी किंवा भिंतीला लागून नसावा. भिंत आणि बेड यामध्ये थोडी जागा शिल्लक ठेवावी.
>> फेंगशुईमध्ये घराची दक्षिण-पश्चिम बाजू प्रेमासाठी चांगली जागा मानली जाते. अशा परिस्थितीत ही जागा शक्य तितकी सजवावी. भिंतींवर गुलाबी, हलका किंवा निळा रंग वापरून सकारात्मक ऊर्जा वाढवता येते. त्यावर लव्ह बर्ड्स किंवा राधा कृष्णाचे चित्र, तसेच मोरपीस, बासरी लावून सुशोभित करता येते.
>> बेडरूमच्या भिंतीवर पती पत्नीचा फोटो अवश्य लावावा. तसे केल्याने त्यांच्या प्रेमळ क्षणांच्या आठवणी त्यांना वादापासून परावृत्त करतात आणि कितीही वाद झाले तरी पुन्हा परस्परांजवळ आणतात.