पाणी जपून वापरा हे आपण वाचतो पण प्रत्यक्षात पाण्याची बचत करत नाही. विशेषत: उन्हाळ्यात पाण्याची किम्मत आपल्याला कळते. पाणी येणार नाही कळल्यावर डोळ्यात पाणी येते. पिण्यासाठी, वापरासाठी पाणी लागणारच आहे. म्हणून पाण्याला जीवन म्हटले आहे. ते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. सोबतच दिलेल्या वास्तु टिप्सचेही पालन करा.
वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने घरात सकारात्मकता येते. अशा परिस्थितीत, वास्तु नियमांकडे लक्ष दिल्यास, व्यक्तीला त्याच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. असाच एक नियम आहे घरात योग्य जागी पाणी ठेवण्याचा! त्या नियमाचे योग्य पालन केले तर घरात सकारात्मक बदल दिसून येतील.
पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वास्तुशास्त्रात पाणी ठेवण्याची योग्य दिशा सांगितली आहे. अशा परिस्थितीत पाण्याशी संबंधित या वास्तू नियमांचे पालन केल्यास जीवनात फायदे पाहायला मिळू शकतात. तसेच वास्तु नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या समस्या वाढू शकतात.
पाण्याची टाकी :
वास्तूनुसार घरातील बोरिंग किंवा पाण्याची टाकी आग्नेय दिशेला ठेवू नये. कारण ती अग्नीची दिशा मानली जाते. असे म्हणतात की अग्नी आणि पाणी यांच्या संयोगाने वास्तू दोष निर्माण होतात. त्या प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच पाण्याची टाकी, पाण्याची भांडी, जसे की माठ, कळशी, हंडा दक्षिण आणि नैऋत्य दिशेला ठेवल्याने कौटुंबिक नुकसान होते.
पाणी कुठे ठेवावे :
वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा ही पाणी भरण्यासाठी सर्वोत्तम जागा मानली जाते. त्यामुळे पाण्याची टाकी बोअर करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा उत्तम मानली जाते. भांडी पाण्याने भरलेली ठेवण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा योग्य आहेत. हे नियम लक्षात ठेवल्यास घरात आर्थिक समस्या येत नाही.
या गोष्टी लक्षात ठेवा :
वास्तू शास्त्रानुसार घरातील नळ कधीही गळके नसावे, अन्यथा घरामध्ये वास्तू दोष निर्माण होऊ शकतात. घरातला पैसा पाण्यासारखा वाहू लागतो आणि त्यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच तुमच्या घरातील गळके नळ किंवा पाईपमधून होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी वेळेत डागडुजी करून घ्या आणि आर्थिक हानी थांबवा.