शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

Vastu Shastra: आज कृष्ण-तुळशीचे करा पूजन; लक्ष्मी मातेचे घरात होईल आगमन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 5:04 PM

Janmashtami 2022: तुळशीला हरिप्रिया असेही म्हणतात. गोकुळाष्टमीच्या उत्सवानिमित्त कृष्णाबरोबर तुळशीची अशी करा पूजा!

बहुगुणी व्यक्तिमत्त्व सर्वांनाच आवडते. त्याप्रमाणे 'तुळस' देखील बहुगुणी आहे, म्हणूनच ती भगवान महाविष्णूंना, विठोबाला, जगन्नाथाला, श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. तुळस हे लक्ष्मीचेच रूप. तुळशीची पूजा केली, की लक्ष्मी प्रसन्न होणार आणि लक्ष्मी प्रसन्न झाली, की लक्ष्मीपतींची कृपादृष्टी नक्कीच होणार. म्हणूनच तर, गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपणही श्रीकृष्ण आणि तुळशीची पूजा करूया. जेणेकरून विष्णू पत्नी लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तिचीही कृपा प्राप्त होईल. 

हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचे आयुर्वेदिक फायदेही आपणास माहित आहे. शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या मातेसमान मानले जाते. ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते, त्या घरातून दु:खं, दारिद्रय कायमचे निघून जाते. यासाठी तुळशी पूजेत काही गोष्टी समाविष्ट करा.

>> तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीचा विवाह शाळीग्राम याच्याशी झाला होता. शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप होते. त्यामुळे कृष्णरूपी भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल, तर तुळशी अर्पण केली पाहिजे. 

>>तुळशीचे पावित्र्य एवढे आहे, की कितीही पंचपकवान्नाची थाळी असली, तरीदेखील तुळशी दलाशिवाय तो नैवेद्य अपूर्ण समजला जातो. तुळशीच्या छोट्याशा पानाने नैवेद्याला पूर्णत्त्व येते आणि त्या भोजनात प्रसादत्त्व उतरते. तीर्थात देखील तुळशीचे पान घालून मगच ते तीर्थ प्राशन केले जाते. रोज सकाळी तुळशीची दोन पाने चावून खाल्यास सर्व प्रकारच्या रोगांना कायमचे दूर ठेवता येते, असा तुळशीचा महिमा आहे.

>>तुळशीमुळे वातावरण शुद्ध होते. म्हणून तुळशीच्या आसपासच्या परिसरात देवीदेवतांचा वास असतो असे मानतात. कारण ते वातावरण देवीदेवतांनाही आकर्षित करते. म्हणून तो परिसर कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवावा. 

>>तुळशी जेवढी पवित्र तेवढीच तिची डहाळी, फांद्या, मंजिरी आणि मातीदेखील पवित्र मानली जाते. कारण त्या मातीत तुळशीची मूळं रुजलेली असतात. म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीतील माती कपाळी लावावी.

>>तुळशीच्या रोपात अकारण वाढलेले तण उपटून फेकून न देता, ते गवत एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवावेत. तुळशीच्या सान्निध्यात आल्याने त्या अकारण वाढलेल्या गवतालाही लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो आणि ते गवत आपल्या मिळकतीबरोबर ठेवल्याने धनवृद्धी होते.

>>तुळशीजवळ रोज सायंकाळी दिवा लावावा आणि दिव्याच्या खाली, मंगल कलशाखाली ठेवतो, तशीच धान्याची छोटीशी राशी रचावी. त्यावर दिवा ठेवावा. ते दृष्य पाहून माता लक्ष्मी प्रसन्न होते. दिव्याच्या स्वच्छ प्रकाशात ते धान्य छोट्या जीव जंतूंना मिळते आणि सत्कर्म घडते. 

>>तुळशीची मंजिरी कृष्णाला प्रिय असते. म्हणून रोजच्या देवपूजेत तुळशी दलाबरोबर मंजिरी असल्यास कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशी ही संजीवनी आहे. तिचे पावित्र्य कायम राखावे. तुळशी माळा धारण करणाऱ्यांनी मद्यपान तसेच मांसाहार यांचे सेवन करू नये. हे नियम पाळले असता, तुळशी मातेचा, लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा वरदहस्त लाभून दु:खं-दैन्य दूर होते. 

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीVastu shastraवास्तुशास्त्र