शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Vastu Tips: दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळा आणि वास्तू तसेच आरोग्याचीही शुद्धी करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 3:27 PM

Shravan 2023: श्रावण मासात व्रत वैकल्याच्या निमित्ताने कापराचा वापर करा आणि तना-मनाची शुद्धी मिळवा; जाणून घ्या फायदे!

श्रावण मास हा अनेक सण उत्सव आणि वर्षासरी घेऊन येत असला तरी पाठोपाठ आजारही घरात शिरकाव करतात. त्यावर उपाय म्हणजे कापूर! व्रताची सांगता करताना आपण शेवटी आरती आणि कापुरार्ती करतो. कापराच्या वासाने वातारवरणनिर्मिती तर होतेच, त्याबरोबर अनेक प्रकारचे आजारही बरे होऊ शकतात. मात्र त्यासाठी भीमसेनी कापूर वापरायला हवा.

  • जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही घरात दररोज संध्याकाळी कापूर जाळावा. असे केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो. वातावरण प्रसन्न होते.
  • अपघात टाळण्यासाठी लोक हनुमानाच फोटो किंवा फेंग शुईच्या वस्तू त्यांच्या कारमध्ये लावतात. त्याचबरोबर कापराच्या वडीचाही वापर करता येईल. रात्री कापूर जाळून तुम्ही हनुमान चालीसा वाचा. वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूरच्या दोन गोळ्या घरात ठेवा आणि ती विरघळली की पुन्हा दोन गोळ्या ठेवा. आपण वेळोवेळी हे करत राहिल्यास हे घरातील वास्तू दोष दूर होतील.
  • लग्न ठरण्यात विलंब होत असल्यास कापराचे ६ तुकडे आणि ३६ लवंगाचे तुकडे घ्या आणि त्यात तांदूळ आणि हळद मिसळा. देवी दुर्गेची आरती करून त्यात या वस्तू अर्पण करा. असे केल्याने लग्न लवकर ठरते असा अनेकांना अनुभव आहे.
  • ग्रहांच्या शांतीसाठीदेखील आपण कापूर वापरू शकता. तूपात भिजलेला कापूर दररोज सकाळ, संध्याकाळ आणि रात्री जाळावा.
  • कापूरच्या दोन गोळ्या घराच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये ठेवल्या पाहिजेत.
  • जर तुम्हाला अवास्तव खर्च करण्याची सवय असेल तर सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही कापूरचा दिवा लावावा आणि संपूर्ण घराभोवती फिरावे, त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी. यामुळे तुमची अतिरिक्त खर्चाची सवय कमी होईल.
  • जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही श्री यंत्रासमोर कापूर जाळून पूजा करावी. याद्वारे आपल्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होईल.
  • जर आपल्या घरात प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीत दोन कपूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळच्या भांड्यात ठेवा. असे केल्यास घरात नकारात्मकता संपेल. आपल्याकडे चांदीची वाटी नसेल तर आपण स्टीलच्या भांड्यात ठेवू शकता.
  • जर आपल्या घरात वारंवार भांडण होत असतील आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येत नसतील तर आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरची गोळी ठेवावी. यामुळे घराचे वातावरण सकारात्मक होईल.
  • वैवाहिक जीवनात अडचणीअसतील, तर बेडरूम मध्ये कापराच्या दोन गोळ्या ठेवाव्यात. त्याच्या सुगंधाने वातावरण सकारात्मक होईल आणि आपले नातेही मधुर होईल.
  • दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर शुद्ध तुपात बुडवून ठेवा. मग त्यास घराभोवती फिरवा. असे केल्याने घरात सुख-शांती कायम राहते.

आता जाणून घेऊ आरोग्यासाठी असलेले फायदे

  • कापूर, ओवा आणि पेपरमिंट एक सारख्या प्रमाणात घ्या. त्यांना एका काजेच्या बाटली टाका. त्या बाटलीला उन्हात ठेवा. थोड्या वेळाने ती बाटली हलवत जा. त्यानंतर त्यातील चार थेंब बत्ताशावर किंवा साखरेच्या सरबतात टाका. हे जुलाब झालेल्या व्यक्तीला द्या. जुलाब थांबतील.
  • पोटदुखी आणि अस्वस्थता यात कापूर खूप फायदेशीर आहे. पोटात दुखत असेल अशावेळी कापूर, ओवा आणि पेपरमिंट साखरेच्या सरबतात टाकल्यास पोट दुखी नाहिशी होते.
  • त्वचेसाठी कापूर खूप फायदेशीर आहे. कापूर कोशिकांना मजबूत करतो. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
  • स्नायूतील दुखणे कमी करण्यात कापूरची मदत होते. स्नायू किंवा संधीवातचा आजार असल्यास कापूरचे तेलाने मालीश करा. आराम मिळू शकतो आणि दुखणे पळून जाते.
  • खाज आल्यास कापुराचा उपयोग करा. खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावा, खाज बंद होते.
  • संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे. संधिवात कापूरच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो.
  • जळले किंवा भाजल्यास कापूराचं तेल खूप उपयोगी आहे. त्याने आग कमी होते.
  • शरीराचा एखाद्या भागात वेदना होत असतील तर कापराच्या तेलाने मसाज करा. असे केल्याने वेदना दूर होतील. सांधेदुखीपासूनही सुटका मिळवायची असेल तर कापराचा उपयोग केला जाऊ शकतो.
  • तुमच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्या पाण्यात काहीवेळ पाय ठेवा.
  • जर तुम्हाला जखम झालेली असेल किंवा कापलेलं असेल तर कापरामध्ये पाणी मिश्रित करुन त्या जखमेवर लावा. कापरात अॅंटीबायोटिक असतं जे जखम भरण्यास मदत करतं.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रShravan Specialश्रावण स्पेशल