शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

Vastu Tips: वाढत्या महागाईच्या काळात घरात पैसा टिकत नसेल तर 'हे' बदल अवश्य करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 1:28 PM

Vastu Shastra: घरात पैसा येताच त्याला पाय फुटतात आणि बचत होतच नाही अशी अनेकांची व्यथा असते, ती दूर करण्यासाठी या वास्तूटिप्स फॉलो करा. 

कितीतरी लोकांकडून तुम्ही ही बाब ऐकली असेल, की माझ्या हातात पैसा टिकत नाही. यासाठी ते आर्थिक जबाबदारी घेणेसुद्धा टाळतात. कदाचित तुम्हीसुद्धा त्यापैकी एक असू शकता. पैसे नेहमी अनावश्यक ठिकाणी खर्च होतात असे नाही, परंतु पैसे हातात येताच त्याला पाय फुटल्यागत काही ना काही निमित्ताने ते खर्च होतात. अचानक आरोग्याच्या तक्रारी, घरातली छोटी मोठी खरेदी, कोणाची जुनी देणी वगैरे काहीही निमित्त होते आणि पैसा कापरासारखा उडून जातो. एवढे कष्ट घेऊन पैसा टिकत नसेल तर कोणाचाही मनःस्ताप होणे स्वाभाविकच आहे. यावर वास्तू शास्त्राने सांगितलेला तोडगा आजमावून बघा. 

आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते. कसे ते सविस्तर जाणून घेऊ. 

पैसा एकाजागी ठेवू नका :

हा तोडगा वाचताक्षणी तुम्हाला आपली आई आजी आठवली असेल. त्या कधीही एका जागी पैसे ठेवत नाहीत. कधी तांदुळाच्या डब्यात, तर कधी पिठाच्या डब्याखाली, कधी देवघरात तर कधी माळ्यावर. याचे कारण हेच, की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा  आपणच बचत केलेले पैसे अशा वेळी उपयोगी पडतात. बचतीचा हाच मार्ग बँकादेखील अनुसरतात. एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवींच्या स्वरूपात ग्राहकाचा पैसा सुरक्षित कसा राहील या दृष्टीने तजवीज करतात. वास्तूशास्त्र देखील हेच सांगते. 

घरात सुरक्षितता पैसा कुठे ठेवायचा?

वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेशी देवतांचा संबंध आहे. या दिशांना देवतांचा वास असतो. अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते.

घरातला या दिशेला पैसे साठवू नका! 

वास्तुशास्त्राच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये. कारण यामुळे धनाची हानी तर होतेच शिवाय संपत्तीची वाढही थांबते. बराचसा पैसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होतो. यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये. तसेच या दिशेने जमा केलेला पैसा अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो. पैशांचा हा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा आणि हा बिनखर्चिक पर्याय वापरून पैशांची वृद्धी होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र