वास्तुशास्त्राप्रमाणे फेंगशुईमध्येही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यावर आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यावर भर देण्यात आली आहे.फेंगशुईमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या गोष्टींचे पालन केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते. कुटुंबातील कलह घरातील सुख-शांती हिरावून घेतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा येतो. अशा परिस्थितीत फेंगशुईच्या वास्तू नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. याने जीवनातील समस्या सोडवता येतात.
फेंग शुईचे महत्त्वाचे नियम
>>फेंगशुईनुसार घराच्या जवळपासच्या परिसरात स्मशान किंवा एखादी पडीक जमीन नसावी. त्यामुळे नकारात्मक लहरी घरात येतात. नाईलाजाने अशा ठिकाणी घर घ्यावे लागेल तर धार्मिक विधी करून मगच गृहप्रवेश करावा.
>>घराचा मागचा दरवाजा समोरच्या दरवाजासमोर नसावा. असे मानले जाते की, घरामध्ये प्रवेश करताच जीवन ऊर्जा निघून जाते. तुमच्या घराची रचना अशी असेल तर मधल्या जागी पडदा लावून घ्या किंवा शक्य असल्यास दार बसवून घ्या.
>>घराच्या मुख्य गेटसमोर कचराकुंडी ठेवू नका. घराच्या आवारात एखाद्या कोपऱ्यात ठेवा परंतु प्रवेशद्वारासमोर ठेवू नका.
>>फेंगशुईमध्ये, स्वयंपाकघर आणि शौचालय समोरासमोर असणे दोषपूर्ण मानले जाते. एक तर स्वयंपाक घराची जागा बदला किंवा घर लहान असेल तर पडद्याचा वापर करा.
>>तुमचा बंगला असेल तर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी घराच्या मध्यभागी पायऱ्या बनवू नका.
>>घरातील खिडक्यांची दारे घरात नाही तर बाहेरच्या दिशेने उघडणारी असावीत! असे केल्याने घरात जीवन उर्जेचा अधिक प्रवाह होतो. तसेच घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.