पैसे कमवण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात पण काही चुका करतात ज्यामुळे कष्टाने कमवलेला पैसाही टिकत नाही. धर्म पुराण, वास्तुशास्त्र इत्यादींमध्ये या चुका, वाईट सवयींबद्दल माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून व्यक्तीला त्रास, आर्थिक नुकसान, आरोग्य समस्या इत्यादीपासून वाचवता येईल. आज आपण खाण्याशी संबंधित वाईट सवयींबद्दल जाणून घेऊया ज्या माणसाला गरिबीकडे घेऊन जाऊ शकतात .
ताटात मीठ सोडणे फारच अशुभ आहे
मीठ हे समुद्रातून उत्पन्न होते. लक्ष्मीदेखील समुद्रातून आली आहे. त्यामुळे मीठ हा लक्ष्मीचा भाऊ. त्याचा अपमान झाल्यास लक्ष्मी रुष्ट होते. तसेच जेवताना ताटात मीठ तसेच टाकल्याने अन्नपूर्णादेखील रुष्ट होते. अन्नपूर्णा हे देखील देवीचे रूप आहे. म्हणून तिची नाराजी दारिद्रयाचे कारण बनते. त्यामुळे नेहमी जेवढे हवे तेवढेच अन्न तसेच मीठ ताटात घ्या. मीठ शेवटी उरले किंवा जास्त झाले असेल तर मिठावर पाणी टाकून मनोमन अन्नपूर्णेची माफी मागावी. त्यामुळे अन्नपूर्णा आणि लक्ष्मी मातेची अवकृपा होण्याचे प्रमाण कमी होते.
त्याचप्रमाणे आणखीही काही वाईट सवयी -
काही लोकांना सवय असते की ते बेडवर बसून खातात. असे करणारे लोक नेहमी पैशाच्या तुटवड्याला बळी पडतात. इतकंच नाही तर शास्त्रात असंही सांगण्यात आलं आहे की, ही सवय व्यक्तीला कर्जबाजारी करते. ही स्थिती माणसाला गरीब बनवते. पलंगावर बसून जेवणे हा अन्नपूर्णेचा आणि लक्ष्मी मातेचा अपमान समजला जातो. ती जागा आपण बसण्यासाठी, झोपण्यासाठी वापरतो. तिथे आपल्या पायाची माती लागते. ती आपल्या अन्नात जाऊ नये, हासुद्धा विचार त्याला जोडलेला असावा. म्हणून, जेवताना किंवा काहीही खाताना नेहमी जमिनीवर बसा आणि आपले ताट पाटावर, चौरंगावर ठेवा. जमिनीवर ताट ठेऊन अन्न खाणे देखील चांगले मानले जात नाही. त्यामुळे सूक्ष्म जीव जंतू ताटात जाण्याची भीती असते.