शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
3
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
4
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
5
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
6
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
7
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
8
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
9
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
10
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
11
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
12
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
13
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
14
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
15
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
16
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
17
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

Vat Purnima 2024: वडाच्या फांदीला नाही, तर वटवृक्षाला पुजण्याचे अगणित फायदे लक्षात घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:18 AM

Vat Purnima 2024: वटपौर्णिमेला पूजा जरी वटवृक्षाची असली तरी त्याच्या सावलीत अनेक लाभ स्त्रियांनाच होतात, कसे ते पाहू. 

निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाहीत. अशीच कथा आहे वटपौर्णिमेची! सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात. २१ जून रोजी वटपौर्णिमा आहे. त्यानिमित्त त्याचे महत्त्व आणि कोणकोणते लाभ होतात ते पाहू. 

>> वटवृक्ष हा एक पवित्र महावृक्ष म्हटला जातो. कुरुक्षेत्री देवांनी यज्ञ केला, त्या वेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्यातून एक वटवृक्ष बनला, अशी शतपथ ब्राह्मणात वटवृक्षाच्या उत्पत्तीची कथा आहे.

>> वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू बालरूपात वटपत्रावर शयन करतो अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेव वडाच्या झाडावर निवास करते अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया या वृक्षाची अखंड सौभाग्य राहावे, या एकमेव भावनेने मनोभावे पूजा करतात.वड हा मंजिराच्या जातीचा वृक्ष असून रस्त्याच्या कडेला छायेसाठी हे वृक्ष लावतात. 

>> कृष्णवट नावाचा एक वडाचा प्रकार आहे. त्याची पाने किंचित वाकलेली असल्यामुळे ती द्रोणासारखी दिसतात. एके दिवशी गोपालकृष्ण गाईना घेऊन रानात गेला असता, गोपी लोणी घेऊन तिथे गेल्या व आपल्या प्रिय कृष्णाला त्यांनी लोणी दिले. लोणी पुष्कळ होते, म्हणून मनामनात समरसतेचा भाव जागवणाऱ्या कृष्णाने आपले खेळाडी, सवंगडी व गवळी यांना ते वाटले. त्यासाठी कृष्णाने जवळच असलेल्या वडाची पाने तोडून ती जराशी मुडपून घेतली. तेव्हापासून त्या वडाची पाने तशीच द्रोणासारी बनली आणि बीजापासून निर्माण झालेल्या वडांना तशीच पाने येऊ लागली, अशी आख्यायिका आहे. अशा वटवृक्षाला कृष्णवट म्हणतात.

>> प्रयाग येथील अक्षय वटवृक्षाखाली प्रभू श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांनी आश्रय घेतला होता, अशी दंतकथा आहे. या अक्षयवटापासून उत्पन्न झालेल्या वटवृक्षाची अलाहाबाद किल्ल्याजवळच्या एका भुयारातील मंदिरात अद्यापही लोक भक्तिभावनेने पूजा करतात. बडोद्यातील लालवहिया जमातीचे लोक फक्त वडाचीच पूजा करतात.

>> वटवृक्ष हा भगवान शिवाचे निवासस्थान असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत राहतो. त्याच्या पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरतात आणि आपल्या अस्तित्त्वाचे अमरत्व सिद्ध करतात. म्हणूनच वटवृक्षाला संसारवृक्षाचे प्रतीक मानतात.  प्राचीनकाळी ऋषी-मुनी केस घट्ट चिकटून राहून शुद्ध राहण्यासाठी आपल्या जटांना वडाचा चीक लावत असत.

>> भगवान बुद्धांना वटवृक्षाखाली दिव्य ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यामुळे बौद्धधर्मीय या झाडाला अतिशय पवित्र मानतात. वटवृक्षाला सामर्थ्य आणि पावित्र्याचेही प्रतिक मानतात.

>> वडाचा विस्तार, त्याची दाट सावली, त्याची भव्यता यांनी मानवाच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले आहे. मनुष्य मात्रांसाठीच तो जणू खाली वाकतो. भव्यता असूनही विनम्र भाव व्यक्त करतो. त्याच्या पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला 'न्यग्रोध' म्हणतात. >> मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात बडचिचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमितीत येथील वृक्ष, गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवपूर बोटॅनिकल बागेतील वड व अड्यार येथील वड हे वृक्षही प्रचंड असून त्यांच्या छायेत चार-पाच हजार लोक बसू शकतात.

>> वटवृक्ष हे प्रेमिकांना सोयीचे व निवांतपणाचे संकेतस्थान असल्याचा सुखद उल्लेख गाथासप्तशतीत आहे. वटवृक्षातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या कर्बवायूबरोबरच बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने तो इतर वृक्षांपेक्षा अधिक गारवा देतो, असे म्हणातात.

>> वडाची पाने सूज वा ठणका आलेल्या जागेवर गरम करून तेल तूप लावून बांधतात. पारंब्यांचा काढा रक्तवर्धन व शक्तिवर्धक असतो. फळेही बुद्धीवर्धक असतात, असे आपले शास्त्र सांगते. 

>> वटवृक्षाचे एवढे फायदे पाहता त्याच्या सान्निध्यात राहून आपलेही कार्य त्याच्यासारखे वर्धिष्णू व्हावे आणि आपल्या सहवासात इतरांना आल्हाददायक वाटावे असा आदर्श आपण घेतला पाहिजे!

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३