शुक्र ग्रह, जीवनात आनंद, सौंदर्य, समृद्धी, प्रणय या गोष्टींशी निगडित असतो. २२ जून रोजी शुक्राने राशी बदलली आहे. मिथुन राशीतून कर्क राशीत येणारा शुक्र १७ जुलैपर्यंत या राशीत मुक्काम करणार आहे. त्याच वेळेस अन्य राशींच्या वाट्याला कोणकोणत्या घडामोडी येणार आहेत, त्याचा थोडक्यात आढावा.
मेष : या राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होऊ शकतात. हे बदल सकारात्मक असतील. संपूर्ण कुटुंबाचे आणि विशेषत: आईचे विशेष प्रेम मिळेल.
वृषभ : या राशीच्या लोकांच्या जीवनात शुक्राचा हा राशी बदल भौतिक सुखांना वाढवत आहे. गृहसौख्य लाभेल. कौटूंबिक सोहळे होतील. परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन : या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक देखील फायदेशीर ठरू शकते. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग आजमावून पाहता येतील. एकूणच, आर्थिक फायद्याची शक्यता आहे.
कर्क : व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण वाढेल, यामुळे कामात यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. प्रयत्नांना यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : शुक्राचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक उत्पन्न वाढेल. परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते.
कन्या : या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल. समाजातही आदर वाढेल. वाद टाळा. नातेसंबंध जपा अन्यथा शुल्लक कारणावरून नात्यात दरी निर्माण होऊ शकेल.
तूळ : काही काळ कर्ज घेणे टाळा. कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.तज्ञांचा सल्ला घ्या नाहीतर मोठे नुकसान होऊ शकेल. नीट मार्गदर्शन मिळाले, तर लाभ होण्याचीही शक्यता आहे.
वृश्चिक : शुक्राचा संक्रमण काळ तुम्हाला फायदेशीर ठरेल. कठोर परिश्रम केल्याने यश मिळेल. नोकरी, व्यापारानिमित्त परदेशाशी संपर्क येऊ शकतो.
धनु : या लोकांसाठी ही वेळ काळजी घेण्याची आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. शत्रूपासून सावध रहा. संपत्ती आणि आरोग्याची काळजी घ्या.
मकर : शुक्र राशीच्या राशीच्या बदलामुळे नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी दूर होतील. याशिवाय विवाहित जीवनही सुखी होईल.
कुंभ : नवीन कामाची संधी मिळेल. जुन्या कामाचा दबाव कमी होईल. दरम्यान कर्ज घेणे टाळा आणि वादविवाद होणार नाहीत, याची काळजी घ्या.
मिन : शुक्राचे राशि परिवर्तन प्रेम संबंधांबाबतीत यशस्वी होईल. शिक्षणाच्या बाबतीतही ते चांगले आहे. आपणास कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर धीर धरा कारण लवकरच तुमचा यशाचा काळ सुरू होत आहे.