शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

Vijaya Ekadashi 2023: भगवंत प्रत्येकावर बारीक नजर ठेवून आहे, याची साक्ष पटवून देणारी छोटीशी कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 6:12 PM

Vijaya Ekadashi 2023: ज्याने चोच दिली तो चारा देतोच, असे म्हणतात, अशी उदाहरणं वाचली, अनुभवली की आपलीही खात्री पटते, नाही का?

आपण सगळेच जण कोणा न कोणाला उत्तर देण्यासाठी बांधील असतो. आपण वरिष्ठांना उत्तर देतो, वरिष्ठ त्यांच्या वरिष्ठांना उत्तर देतात. सगळ्या कर्मचाऱ्यांचा मालक असतो, तो कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यास बांधील असतो. याचाच अर्थ आपल्या कामावर लक्ष ठेवणारे असतातच. मग तुम्ही मालक असाल नाहीतर सेवक. अहो आपले जाऊद्या, पण खुद्द परमेश्वरालासुद्धा आपल्या कामाची पावती द्यावी लागते, तिथे आपली काय कथा? पण कामात चोख असणाऱ्याला शिक्षेची भीती नसते. भगवान विष्णूंच्या बाबतीत एकदा असेच झाले. लक्ष्मी मातेने त्यांची एकदा परीक्षा घेतली, त्यात ते उत्तीर्ण झाले की नाही, हे जाणून घेण्यासाठी पुढील कथा वाचा. 

परमपिता परमात्म्याने ब्रह्मा विष्णू महेश या देवांना निर्माण करून सृष्टीचे चलन वलन करण्याचे कार्य सोपवले. त्यांच्यापैकी भगवान विष्णू यांना सृष्टीच्या पालनपोषणाची जबाबदारी दिली.

एकदा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणली, 'भगवान आज आपण भूतलावरील सर्व प्राणिमात्रांच्या भर पोषणाची जाबदारी योग्यरित्या पार पाडून आलात का?'भगवान विष्णू म्हणाले, 'होय देवी. या धरतीवरील प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जगत असतो. विधात्याच्या नियमाुसार प्रत्येक जीव उपाशी राहू नये याची मी काळजी घेत असतो.'माता लक्ष्मी म्हणाल्या, 'परंतु भगवान या क्षणी मात्र एक जीव उपाशी आहे. त्याच्या भोजनाची व्यवस्था आपण कशी करणार?'भगवान विष्णू म्हणाले, 'मी माझ्या कर्तव्यात कसर ठेवली नाही. या क्षणी कोणताही जीव उपाशी नाही, हे मी खात्रीने सांगतो.'माता लक्ष्मी म्हणाल्या, 'हातच्या कंकणाला आरसा कशाला? आता मी पुराव्यासह दाखवते.' 

असे म्हणून लक्ष्मीमातेने एक बंद डबी दाखवली. 'भगवान, या डबीत एक चिमुकला जीव कालपासून उपाशी आहे. कालच मी एका मुंगीला पकडून या डबीत बंद करून ठेवले आहे. तिला अन्न कुठून मिळणार बरं?'भगवान विष्णू म्हणाले, 'आणा ती डबी इथे!'

त्यांनी डबी उघडून दाखवली. आतमध्ये मुंगी तांदळाच्या दाण्याचा मजेत आस्वाद घेत होती. ते दृष्य पाहून माता लक्ष्मी ओशाळल्या. त्या क्षमा मागत म्हणाल्या, 'भगवान एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही, की ज्यावेळी मी हा जीव डबीत कोंडून ठेवला तेव्हा तिथे तांदळाचा दाणा कसा आला?'भगवान विष्णू म्हणाले, 'देवी प्रत्येक जीवामध्ये मी साक्ष रूपाने असतो. ज्यावेळी तुम्ही मुंगीला बंद करणयासाठी डबी उघडली, तेव्हा तुमच्या कपाळावरील तांदळाचा दाणा त्या डबीत पडला आणि त्या जीवाची भोजनाची व्यवस्था झाली.'

ईश्वर प्रत्येक प्राणिमात्राचा भार वाहत असतो. परंतु आपल्याला ईश्वरी कृपेचा ठाव लागत नाही. म्हणून संत कबीर म्हणतात,  चिटी के पग में घुंगरू बांधे, वह भी अल्ला सुनता है!रामनाम तू भजले प्यारे काहे को मगरूरी करता है!

जर भगवंत त्यांची कामगिरी चोखपणे बजावत आहेत, तर आपण आपल्या कामात कसूर का ठेवा? नाही का?