शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

Vinayak Chaturthi 2023: विनायकीनिमित्त गणेशाच्या पवित्र स्थानांचे दर्शन घेऊया आणि गणेश उपासना करूया!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:35 AM

Vinayak Chaturthi 2023:आज विनायकी चतुर्थी आहे, त्यानिमित्त गणेश स्थानांचे स्मरण करूया आणि गणेश स्तोत्र म्हणत उपासनाही करूया. 

आपल्या आवडत्या बाप्पाची प्रार्थना,स्तुती करण्यासाठी आपण पूजेला स्तोत्र पठणाची जोड देतो. जसे की संस्कृतातले किंवा मराठीत भाषांतरित केलेले 'गणपती स्तोत्र' अवघ्या दोन मिनिटांत म्हणून होते. हे स्तोत्र संकटनाशन स्तोत्र म्हणूनही ओळखले जाते. ते पाठ करायलाही सोपे असल्याने बालपणापासूनच मुखोद्गत असते. परंतु, आपल्याला त्याचा अर्थ माहीत असतोच असे नाही. विनायकी चतुर्थी निमित्त या स्तोत्रात दडलेली माहिती जाणून घेऊया. 

संकट नाशन स्तोत्रात बारा गणेश नावांचा व नावानुसार स्थानांचा उल्लेख केला आहे. ही स्थाने सद्यस्थितीत कुठे आहेत, याचीही माहिती दिली आहे. मध्यंतरी समाज माध्यमावर ही उपयुक्त माहिती वाचनात आली व त्यात उल्लेख केल्यानुसार समर्थ रामदास स्वामींनी या स्तोत्रात दडलेली बाराही गणेशस्थाने शोधून काढून बाप्पाचे दर्शन घेतले होते. ती स्थाने कोणती, हे पाहू. 

प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्। तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्।। २।।

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्न राजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम्।। ३ ।।

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्। एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्।। ४।।

१. वक्रतुण्ड : मद्रास राज्यातील कननूर येथील गाव. २. एकदंत : पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ. ३. कृष्णपिंगाक्ष: मद्रास येथे कन्याकुमारीजवळील गाव. ४. गजवस्त्र : ओरिसा राज्यात भुवनेश्वर जवळ. ५. लंबोदर : याची दोन स्थाने आहेत - १. गणपतीपुळे जवळ   २. मध्यप्रदेश येथील पंचमुखी ओंकारेश्वर ६. विकट : हिमालयाच्या पायथ्याशी ऋषिकेश येथे. ७. विघ्नराजेंद्र : कुरु क्षेत्रात कौरव पांडवांच्या युद्धभूमीजवळ. ८. धुम्रवर्ण : दक्षिणेकडे केरळ राज्यात कालिकतजवळ आणि तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर ९. भालचंद्र : रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे  १०. विनायक : काशी क्षेत्रातील अन्नपूर्णा मंदिराजवळचा धुंडीराज गणेश. ११. गणपती : क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती. १२. गजानन : हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळ ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे. 

आता जेव्हा केव्हा तुम्ही हे गणपती स्तोत्र संस्कृतात 'प्रणम्य शिरसा देवं' किंवा मराठीत 'साष्टांग नमन हे माझे' म्हणाल, तेव्हा या बारा तीर्थक्षेत्रांचा आठव तुम्हाला होईल, हे नक्की!

टॅग्स :ganpatiगणपती