शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
4
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
5
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
6
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
7
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
8
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
9
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
10
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
11
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
12
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
13
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
14
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
15
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
16
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
17
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
18
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
19
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
20
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...

Vinayak Chaturthi 2025: अंगारक विनायक चतुर्थीचे वेगळेपण काय? कोणता मंत्र ठरतो प्रभावी? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:52 IST

Vinayak Chaturthi 2025: १ एप्रिल २०२५ रोजी अंगारक विनायक चतुर्थी आहे, पण काय आहे तिचे वैशिष्ट्य आणि प्रभावी उपासना, ते जाणून घेऊ.

१ एप्रिल रोजी अंगारक विनायक चतुर्थी (Angarak Vinayak Chaturthi 2025) आहे. ज्याप्रमाणे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली असता अंगारकी म्हणून तिचे महत्त्व वाढते, तसे विनायकी देखील मंगळवारी आली असता ती अंगारक विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. इतर चतुर्थीच्या तुलनेत अंगारक विनायक चतुर्थीचे वेगळेपण जाणून घेऊ. 

प्रत्येक मासाच्या शुक्ल चतुर्थीला `विनायक चतुर्थी' असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते. तर ज्या कृष्ण चतुर्थीला 'संकष्ट चतुर्थी' म्हणतात, त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो, म्हणजे ती चंद्रोदयव्यापिनी असावी लागते. त्यात चंद्रदर्शनाला महत्त्व असते. हा दोन्ही चतुर्थींमधला मुख्य फरक आहे. 

प्रत्येक मासाच्या शक्ल आणि कृष्ण चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमुद आहेत. परंतु, त्यांचा अधिक तपशील मिळत नाहीत. माघ शुक्ल चतुर्थीला कश्यपमुनी आणि अदिती या दांपत्याच्या पोटी गणपतीने `महोत्कट विनायक' नावाने जन्म घेतला आणि राक्षसांचे पारिपत्य केले. तर कृष्णपक्षात संकष्टीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांच्या पोटी गणेशाने जन्म घेतला, ती भाद्रपद चतुर्थी! पुढे देवांचा सेनापती म्हणून गणेशाने काम केले. म्हणून या दोन्ही चतुर्थींना गणेशव्रत केले जाते. 

संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. उपास शक्य नसेल, तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून 'ओम सिद्धिविनायकाय नम:' या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी.

त्याचप्रमाणे अथर्वशीर्ष म्हणून गणेशाची पूजा करावी. अथर्व म्हणजे ज्याचे मस्तक हलत नाही, शांत असते, संकटकाळातही स्थिर असते, अशा गजाननाचे स्तोत्र. हे स्तोत्र मनोभावे पठण केले असता, तसेच या स्तोत्राची स्पष्ट उच्चारासह एकवीस किंवा सहस्र आवर्तने केली असता, वाचासिद्धी येते असा भाविकांचा अनुभव आहे.

आजच्या तणावात्मक वातावरणात, ही व्रत आणि त्यांचे उपचार मन:शांती देतात. स्तोत्रांची ताकद सकारात्मक वलय निर्माण करते. उपासामुळे आरोग्यशुद्धी होते. जपजाप्यामुळे मन एकाग्र होते. पूजेमुळे वातावरण प्रफुल्लित होते. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम आपल्या तनामनावर होतो. म्हणून अशा व्रतांचे पालन स्वान्तसुखासाठी तरी अवश्य करावे. 

टॅग्स :vinayak chaturthiविनायक चतुर्थीPuja Vidhiपूजा विधी